For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिम्सकडून चुकीचे प्रमाणपत्र दिल्याची तक्रार

10:47 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिम्सकडून चुकीचे प्रमाणपत्र दिल्याची तक्रार
Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

बेळगुंदी येथे आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलीस यंत्रणेला चुकीचे प्रमाणपत्र देण्याची कामगिरी बिम्सच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची तक्रार बेळगुंदी येथील समिती कार्यकर्ते शटूप्पा चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात शट्टूपा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. तसेच सदर निवेदन प्रांताधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्याकडे दिले. सदर निवेदनात चव्हाण यांनी असे म्हटले आहे की,  दि. 6 फेब्रुवारी रोजी आपल्यावर हल्ला करून काहीजणांनी मारहाण केली होती. याप्रकरणी आपण बिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. तसेच एक्स-रे काढण्यात आला. त्यावेळी आपल्याला दुखापत झाली असून हाड मोडल्याचे देखील एक्स-रे मधून स्पष्ट झाले होते. तसा अहवाल देण्यात आला होता. मात्र पोलिसांना देण्यात आलेल्या एक्स-रे रिपोर्टमध्ये बदल करण्यात आले आहेत. सरकारी इस्पितळात आपण या मारहाणी संदर्भात उपचार घेतले. मात्र तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना चुकीचा अहवाल सादर केल्याची तक्रार शट्टूपा चव्हाण यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.