कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्यटनासाठी ‘आयर्नमॅन’सारख्या स्पर्धा आवश्यक : मुख्यमंत्री

02:58 PM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : आयर्नमॅन स्पर्धेमुळे काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी पर्यटन वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात म्हणून त्यास विरोध करु नका, तर सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. पणजी येथे आयर्नमॅन 70.3 या नामांकीत आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे गोवा जागतिक स्तरावर चमकले असून आंतरराष्ट्रीय खेळ पर्यटनासाठी नावाजले आहे. त्याचा फायदा गोवा राज्याकरीता होणार असून ‘स्पोर्टिंग हब’ म्हणून पुढे येणार आहे. गोवा हे आता सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध होत असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. आयर्नमॅन ही मोठी आव्हानात्मक आणि साहसी स्पर्धा असून त्यात 30 देशांमधील 1000 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली. त्या स्पर्धेत पोहोणे, सायकल चालवणे आणि धावणे असे तीन प्रकार समाविष्ट आहेत. ते तीन टप्पे स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात.

Advertisement

वाहतुकीतील बदलामुळे कोंडी

Advertisement

या स्पर्धेसाठी राजधानी पणजी शहरातील दयानंद बांदोडकर मार्गावरील एक लेन तसेच राष्ट्रीय महामार्ग 66 वरील एक लेन वाहतुकीसाठी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. रायबंदर तसेच ओल्ड गोव्याकडे जाणारे रस्तेही बंद करण्यात येऊन वाहतूक वळवल्याने काही ठिकाणी वाहनांची कोंडी झाली तर पणजीत आलेल्या वाहनांना पणजीतून बाहेर जाताना अडचणी निर्माण झाल्या.

फोंड्याकडे जाणाऱ्या वाहनांना ‘द्राविडी प्राणायाम’ करावे लागले. या वाहतूक बदलाची कल्पना वाहतूक पोलिसांनी आगावू दिली होती. तथापि सर्वच वाहनचालकांना त्याची नीट माहिती नसल्याने अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडाला. वळवण्यात आलेल्या वाहतुकीचे बदल सांगण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस सज्ज होते. त्यांनी वाहनचालकांना सहकार्य केले. रविवारी वाहनांची वर्दळ कमी असल्याने सहसा वाहतूक कोंडी होत नाही. तथापि या स्पर्धेमुळे ती झाल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article