For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नावगे येथील ‘त्या’ कारखान्यातील कामगारांना नुकसानभरपाई द्या

11:12 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
नावगे येथील ‘त्या’ कारखान्यातील कामगारांना नुकसानभरपाई द्या
Advertisement

बेळगाव : नावगे क्रॉस येथील स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. लि. या कारखान्याला आग लागून नुकसान झाले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले आहेत. कारखाना पूर्णपणे जळाल्याने आता 400 कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. तेव्हा कारखाना मालकांनी त्यांना नियमित वेतन द्यावे, याचबरोबर मृत्यू झालेल्या व जखमींना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सिटूतर्फे अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये यल्लाप्पा उर्फ यल्लगौंडा सन्नयल्लाप्पा गुंड्यागोळ हा लिफ्टमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याचा भाजून मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांचीही योग्य ती व्यवस्था करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. याचबरोबर इतर कामगारांच्या कुटुंबीयांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज असून संबंधित मालकांनी व्यवस्था करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.