महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जि.प.च्या शाळा स्वयंपूर्ण होण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा; शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

04:29 PM Dec 23, 2023 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur ZP
Advertisement

प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर; राधानगरीतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेटर्स व खाऊ वाटप; दि कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया संस्थेचे योगदान

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस., शैक्षणिक प्रतवारी निर्देशांक अशा स्पर्धा परीक्षा व मूल्यमापनामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेसह भौतिक सुविधांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांचा सक्रीय सहभाग महत्वपूर्ण आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी व्यक्त केले.

Advertisement

दि. कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया संस्थेमार्फत आयोजित राधानगरी तालुक्यातील वि.मं. बुजवडे, वि.मं. मोघर्डे, वि.मं. कासारपुतळे या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वेटर्स व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांशी शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी विविध विषयांवर हितगुज साधले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे देत त्यांनी जीवनात ध्येय निश्चित करुन अभ्यास कसा करावा, व्यक्तीमत्व विकास याबाबत विविध उदाहरणांसह मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचा उत्साह व्दिगुणित केला.

Advertisement

दि. कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत प्राची शेठ खेताणी यांच्यावतीने गेली सहा वर्षे सातत्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्ज, स्वेटर्स, शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप तसेच निराधार महिलांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण केले जात आहे. यापुढेही जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत करणेचा मानस असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी मत व्यक्त केले.

4 हजार 894 विद्यार्थ्यांना केले साहित्य वाटप
दि. कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया मार्फत आजरा तालुक्यातील 20, भुदरगड, 29, चंदगड 12, गडहिंग्लज 16, गगनबावडा 13, हातकणंगले 5, कागल 18, करवीर 9, पन्हाळा 10, राधानगरी 28, शाहुवाडी 15, शिरोळ तालुक्यातील 7 शाळांमधील 4894 विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत करण्यात आले.

Advertisement
Tags :
Community participationimportant to make schoolstarun bharat newsZ.P. Kolhapur
Next Article