महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संवाद हाच युद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग!

06:58 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युक्रेन दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : रशियासोबतचा संघर्ष थांबवण्यासाठी भारत प्रयत्नशील

Advertisement

वृत्तसंस्था/ कीव, नवी दिल्ली

Advertisement

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी युव्रेनच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत. युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्वोदिमिर झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान भारत युद्धग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेले युद्ध टाळण्यासाठी संवाद घडवणे हाच एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. तसेच रशिया आणि युव्रेनलाही त्यांनी शांतता पुनर्स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींच्या या ऐतिहासिक दौऱ्यात रशिया-युक्रेन युद्धावर भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या.

रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक महिन्यांपासून सशस्त्र संघर्ष सुरू आहे. युद्धात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. तसेच संपूर्ण जग दोन गटात विभागले गेले आहे. अशा परिस्थितीत या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत भारताने आपली लोकशाही आणि शांतताप्रिय भूमिका स्पष्ट केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत, मात्र दोन्ही देशांमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपत नाही. एका बाजूला रशिया आहे तर दुसऱ्या बाजूला युक्रेनला युरोप आणि अमेरिकेचा पाठिंबा मिळत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशांत प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले आहे.

 

आलिंगन अन् खांद्यावर हात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कीव येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्वोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. ही बैठक युद्धग्रस्त देशाच्या ऐतिहासिक भेटीचा एक भाग होती. या भेटीत पंतप्रधानांनी झेलेन्स्की यांना आलिंगन देत त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे दिसून आले. मार्टिरोलॉजिस्ट एक्स्पोझिशनमध्ये दोघांनीही हत्या झालेल्या मुलांना श्र्रद्धांजली वाहताना झेलेन्स्की भावूक झाले होते. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू झाली. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

युद्धग्रस्त देशाचा ऐतिहासिक दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. ते 21 आणि 22 ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर राजधानी वॉर्सा येथे होते. यानंतर ते रेल्वेने युद्धग्रस्त युक्रेनला पोहोचले. पोलंडहून दहा तासांच्या प्रवासानंतर पंतप्रधान कीव येथे पोहोचले आणि त्यांनी युक्रेनियन अधिकारी आणि भारतीय समुदायाची भेट घेतली. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. 2022 मध्ये रशियाने युव्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारतीय नेत्यांची ही पहिली उच्चस्तरीय भेट आहे. याच्या महिनाभरापूर्वी मोदींनी रशियाला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती.

पंतप्रधान मोदींनी राजकारण, व्यापार, आर्थिक गुंतवणूक, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मानवतावादी मदत अशा द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर युक्रेनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. तसेच भारत युद्धाच्या निराकरणासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. कीवमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.

 

रशिया-युक्रेन संघर्ष मुलांसाठी विनाशकारी : मोदी

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर मोदींनी ‘एक्स’वर ट्विट केले. त्यात आपण आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कीवमधील मार्टीरोलॉजिस्ट प्रदर्शनात श्र्रद्धांजली वाहिली. रशिया-युव्रेन संघर्ष विशेषत: मुलांसाठी विनाशकारी आहे. या संघर्षात प्राण गमावलेल्या मुलांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. त्यांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना’ असे ट्विट त्यांनी केले.

भारत-युक्रेन यांच्यात चार करार

पंतप्रधान मोदींच्या कीव दौऱ्यात भारत आणि युक्रेनमध्ये चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य, कृषी क्षेत्रातील सहकार्य आणि मानवतावादी मदत याबाबत करार करण्यात आले.  यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची सविस्तर चर्चा झाली.

मोदींचा दौरा युद्ध संपवण्यासाठी उपयुक्त : संयुक्त राष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्याबाबत संयुक्त राष्ट्राकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी याबाबत भाष्य करताना पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे म्हटले आहे. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही त्याबाबत भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोलंड आणि युक्रेनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांचा शांतता आणि मुत्सद्देगिरीचा संदेश जगभर गुंजत असल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article