महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संवाद ‘आत्म्या’शी

06:49 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुनर्जन्म असतो का, किंवा आत्म्याचे अस्तित्व मानायचे की काही, आदी विषयांवर बराच वादविवाद आजवर झालेला आहे. श्रद्धाळू व्यक्तींचा यांच्यावर विश्वास असतो, तर स्वत:ला बुद्धीप्रमाण्यवादी म्हणवून घेणाऱ्यांचा नसतो. या विषयावरचा वाद मानवाला समज आली तेव्हापासूनचा आहे, असे म्हटले जाते.

Advertisement

पण, एक खरे, की, मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काय होते, हे अनादी काळापासून चर्चेत राहिलेले आणि सर्वांच्या कुतुहलाचा भाग राहिलेले प्रश्न आहेत. काही लोक आपण आत्म्याशी संवाद साधल्याचे प्रतिपादन करतात. काही दशकांपूर्वी आत्म्याशी संवाद करण्यासाठीचे साधन म्हणून ‘प्लँचेट’ बरेच लोकप्रिय होते. अशाच प्रकारे अमेरिकेतील बोटोफ्त या महिलेने एक आश्चर्यकारक प्रतिपादन केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या आत्म्याने तिच्या एका जीवलग मित्राशी संवाद केलेला आहे.

Advertisement

ही महिला 29 वर्षांची आहे. 29 जानेवारी 2021 या दिवशी तिच्या पतीने तिला सोफ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. त्वरित तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची अवस्था नाजूक आहे. त्यांचा जीव वाचण्याची संधी केवळ 6 टक्के आहे, असे स्पष्ट मत डॉक्टरांनी व्यक्त केले. शेवटचा उपाय म्हणून त्यांच्यावर तातडीचे उपचार करण्यात आले. त्यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. पण काय चमत्कार घडला कोणास ठाऊक, अचानक तिचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच ती परत शुद्धीवर आली. तिच्या म्हणण्यानुसार या मधल्या काळात तिचा आत्मा तिच्या शरीरात नव्हता. तो तिच्या मित्राच्या घरी होता आणि त्याच्याशी गप्पा मारत होता. तिच्या मित्राने तिच्या आत्म्याला पुन्हा तिच्या शरीरात जाण्यास सांगितल्याने आत्म्याने तसे केले आणि तिच्या मृतवत् शरिरात पुन्हा चेतना निर्माण झाली. तिच्या या वक्तव्यावर बरीच चर्चा होत आहे. तिला कदाचित तसा भास होत असावा, असेही काही जणांचे म्हणणे आहे. पण तिच्या या अनुभवामुळे तिच्या  कुटुंबात आणि मित्रमंडळींमध्ये बरीच खळबळ उडालेली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article