पुढील वर्षी मार्चमध्ये भारतात राष्ट्रकुल खो खो स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी 9 ते 14 मार्च दरम्यान होणाऱ्या पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेत 24 हून अधिक देश भाग घेतील, यासाठी भारतात अद्याप ठिकाण निश्चित झालेले नाही. कॉमनवेल्थ स्पोर्टने (सीएस) भारतात या स्पर्धेला मान्यता दिल्यानंतर खो खो फेडरेशन ऑफ इंडिया अनेक राज्यांशी स्थळ निश्चित करण्यासाठी चर्चा करत आहे. या स्पर्धेत 16 पुरुष आणि तितकेच महिला संघ सहभागी होतील. या वर्षी जानेवारीमध्ये दिल्ली येथे झालेल्या पहिल्या खो खो विश्वचषकाच्या धर्तीवर ही स्पर्धा आयोजित केली जाईल. विश्वचषक स्पर्धेत 23 देशांनी भाग घेतला होता. 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादला अधिकृतपणे यजमान शहर म्हणून मान्यता दिल्यानंतर भारतातील ही पहिलीच राष्ट्रकुल खो खो स्पर्धा असेल.
‘स्थळ निश्चित करण्यासाठी आम्ही अनेक राज्यांशी चर्चा करत आहोत. 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी, आम्हाला आशा आहे की ही स्पर्धा दोहा आशियाई क्रीडा स्पर्धा (2030), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (2030) आणि ब्रिस्बेन ऑलिंपिकमध्ये (2032) खो खोचा समावेश करण्याच्या दिशेने एक पाऊल ठरेल,’ असे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस उपकार सिंग विर्क म्हणाले