31 डिसेंबरपासून राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) पहिल्यांदाच पुरूष आणि महिला राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा एकाच वेळी आयोजित केली आहे. ज्यामुळे भारतातील प्रमुख वरिष्ठ प्रतिभा 31 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात एकाच छताखाली येतील. अधिकृत ड्रॉ 30 डिसेंबर रोजी काढण्यात येईल. या स्पर्धेने भारताच्या पुढील कार्यक्रम चक्राची सुरूवात होईल, असे बीएफआयच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सांगण्यात आले.
जागतिक बॉक्सिंग तांत्रिक आणि स्पर्धा नियमांचे पूर्ण पालन करुन देशभरातील पुरूष आणि महिलांसाठी प्रत्येकी दहा वजन गटामध्ये स्पर्धा होतील. प्रत्येक युनिटला प्रत्येक श्रेणीत एक बॉक्सर खेळवण्याची परवानगी आहे. कोणत्याही राखीव खेळाडूंना परवानगी नाही. पात्र बॉक्सिरचा जन्म 1 जानेवारी 1985 ते 31 डिसेंबर 2006 दरम्यान झालेला असावा. सर्व लढती तीन मिनिटांच्या तीन फेऱ्यांच्या जागतिक स्पर्धा स्वरुपाचे अनुसरण करतील. ज्यामध्ये एक मिनिट विश्रांतीचा काळ आणि 10 पॉईंट मस्ट स्कोअरिंग सिस्टीम असेल.
भारतासाठी एका महत्त्वाच्या क्षणी राष्ट्रीय बॉक्सिंग परत येईल. 2025 च्या सुरवातीला पुरूष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसह सुरू झालेल्या मागील सायकलने स्थानिक प्रणालीतून वेगाने प्रगती करणाऱ्या राष्ट्रीय शिबिरात स्थान मिळवणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची एक पिढी निर्माण केली. त्या रचनेचा शेवट भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीत झाला. ग्रेटर नोएडा येथे झालेल्या 2025 च्या जागतिक बॉक्सिंग कप फायनलमध्ये नऊ सुवर्णांसह विक्रमी 20 पदके भारताने मिळविली.
भारताच्या जागतिक बॉक्सिंग कप फायनल अनेक तेजस्वी स्टार्सनी मागील राष्ट्रीय स्पर्धेत आपली प्रगती सुरू केली. विश्व बॉक्सिंग कप फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकणारे सचिन सिवाच आणि हितेश गुलिया हे पहिले राष्ट्रीय विजेते होते. मिनाक्षी आणि जस्मिन, जे आता जागतिक विजेते आहेत, यांनीही या स्पर्धेत आपले सुरूवातीचे विधान केले. आंतरराष्ट्रीय कॅलेंडर लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक सायकलकडे वाटचाल करत असताना, नॅशनल्स पुन्हा एकदा भारताच्या एलिट प्रोग्रामचे प्रवेशद्वार बनले आहेत. सर्व्हिसेस पुरूष संघ राष्ट्रीय गतविजेता म्हणून उतरणार आहे तर रेल्वे महिला संघ विजेतेपद राखण्याच्या प्रयत्न करेल.