बेळगावमधील काँग्रेस अधिवेशनाच्या शतक महोत्सवासाठी समिती नियुक्त
मंत्री एच. के. पाटील अध्यक्ष, मोईली मानद अध्यक्ष
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेळगाव येथे 1924 साली महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. या घटनेला 100 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राज्य सरकार बेळगाव अधिवेशन शतक महोत्सव साजरा करणार आहे. या दृष्टीने कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने ‘बेळगाव अधिवेशन शतक महोत्सव समिती’ नेमली आहे. मंत्री एच. के. पाटील हे या समितीचे अध्यक्ष तर माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली हे मानद अध्यक्ष आहेत.
म. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाला यंदा 100 वर्षे होत असल्यानिमित्त शतक महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत माहिती दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे आदर्श, तत्व, स्वातंत्र संग्रामातील त्याग आजच्या पिढीला प्रेरणादायी आहेत. याविषयी युवा पिढीला जाणीव करून देण्यासाठी बेळगाव अधिवेशन शतकमहोत्सव साजरा केला जाणार आहे. या दृष्टीने सरकारला आणि पक्षाला कार्यक्रमाची रुपरेषा आखून देण्यासाठी मंत्री एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व वीरप्पा मोईली मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वातील समितीमध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती बी. एल. शंकर हे संचालक असून पक्षाच्या 15 विविध युनिटचे अध्यक्षांसह 60 सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती दिली.
राज्य काँग्रेसने जारी केलेल्या समितीमध्ये 69 सदस्यांचा समावेश आहे. त्यात मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार महांतेश कौजलगी, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार फिरोज सेठ, अंजली निंबाळकर, लक्ष्मण सवदी, डीसीसी बँकेचे चेअरमन लक्ष्मणराव चिंगळे, मंत्री रामलिंगारे•ाr, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, ईश्वर खंडे, कृष्णभैरेगौडा, एन. एस. बोसराजू, एच. सी. महादेवप्पा, चेलुवरायस्वामी, मधू बंगारप्पा, प्रियांक खर्गे, शिवराज तंगडगी, एस. एस. मल्लिकार्जुन, डॉ. एम. सी. सुधाकर, कर्नाटक काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष विनयकुमार सोरके, माजी केंद्रीयमंत्री के. रेहमान खान यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.