महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तळगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - निलेश राणे

02:17 PM Nov 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा तळगाव दौरा : मोठे मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

Advertisement

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी गावभेट दौऱ्यात तळगाव येथे श्री देव रामेश्वर, रवळनाथ, सातेरी देवतांचे आशीर्वाद घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांना अपेक्षित गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण यांना मोठे मताधिक्य गावातून देण्यात आले. त्याच धर्तीवर विकासाच्या मुद्द्यावर निलेश राणे यांनाही गावातून मोठे मताधिक्य असेल. असा निर्धार ग्रामस्थांच्या वतीने जगदीश चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपसरपंच नरेंद्र पावसकर यांनीही विचार मांडले. यावेळी निलेश राणे यांचा सत्कार नरेंद्र पावसकर यांनी केला. तर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सत्कार उपसरपंच संतोष पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गावडेवाडी येथील ललित जनार्दन गावडे यांच्या निवासस्थानी महायुतीची संवाद बैठक झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, भाजपा प्रभारी सतीश वाईरकर, युवासेना जिल्हाध्यक्ष ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाध्यक्ष सोनाली पाटकर, भाजपा पदाधिकारी जगदीश चव्हाण, उपसरपंच संतोष पेडणेकर, महेश परब, नरेंद्र पावसकर, चारूहास दळवी, मंगेश चव्हाण, प्रशिला गावडे, संतोष देसाई, महादेव म्हसकर, बुथ अध्यक्ष, राजेंद्र दळवी, बुथ अध्यक्ष महादेव दळवी, संदीप चव्हाण, उमेश राणे, संदीप दळवी, सुभाष सावंत, बाळा दळवी यांसह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपास्थित होते. उपसरपंच संतोष पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. आज महायुती पदाधिकारी यांच्या बैठकीत निलेश राणे यांच्या हस्ते संतोष पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. एकूणच निलेश राणे यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg# news update # mararthi news #
Next Article