कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयुक्तांची विभागीय कार्यालयांना अचानक भेट

12:54 PM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ए-बी खाता घेण्यासाठी एजंट सक्रिय : एजंटांना थारा न देण्याची मनपा अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : ई-आस्थी प्रणालीअंतर्गत मिळकतींची नेंद करून घेऊन ए व बी खाते देण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात एजंटराज वाढल्याचा आरोप नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी केला होता. याची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी सोमवार दि. 5 रोजी गोवावेस आणि अशोकनगर येथील विभागीय कार्यालयांना अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी दोन्ही ठिकाणी एजंटांचा सुळसुळाट वाढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मिळकतींची नोंदणी करण्यासाठी येणाऱ्यांचे आधारकार्ड घेण्यात यावे, त्याचबरोबर एजंटांना थारा देण्यात येऊ नये, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.

Advertisement

महापालिकेच्या व्याप्तीतील शहर व उपनगरात असलेल्या मिळकतींना ए व बी खाता दिला जात आहे. मिळकतींची ई-आस्थीअंतर्गत नोंदणी करून घेतली जात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या कामासाठी एजंटांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. शनिवारी महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींसह नगरसेवकांनी महसूल खात्याचे अक्षरश: वाभाडे काढले. एखाद्या मिळकतीला ए किंवा बी खाता मिळवून देण्यासाठी नगरसेवक मनपाच्या विभागीय कार्यालयात गेल्यास वेगवेगळी कारणे सांगून कामे करून देण्यास अधिकारी विलंब करत आहेत. मात्र एजंट तेच काम घेऊन गेल्यास अवघ्या काही मिनिटांत मिळकतींची नोंद करून घेऊन ए व बी खाता दिला जात आहे. इतकेच नव्हे तर एजंटांच्या मोबाईलवर सर्टिफिकेट व्हॉटसअॅप केले जात आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची उडाली भंबेरी 

अशोकनगर, कोनवाळ गल्ली आणि गोवावेस येथील विभागीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात एजंट सक्रिय आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व कार्यालयांना अचानकपणे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याची गांभीर्याने दखल घेत सोमवारी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी सकाळी एकट्याच अशोकनगर आणि गोवावेस येथील कार्यालयांना भेट दिली. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता मनपा आयुक्त कार्यालयात दाखल झाल्याने त्याठिकाणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. दोन्ही कार्यालयांमध्ये एजंट सक्रिय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एजंटांच्या हातात ई-आस्थीच्या अनेक फाईली असल्याचेही दिसून आले. त्यामुळे मिळकतधारकांनी स्वत: येऊन अर्ज करावेत, एजंटांकरवी अर्ज आल्यास त्याचा स्वीकार करू नये, अर्जदारांचे आधारकार्ड घ्यावे. त्याचबरोबर ए व बी खाता देताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरण होईल याची काळजी घ्यावी, अशी सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आली.

गोवावेस, अशोकनगर कार्यालयात एजंटराज

महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी ए व बी खात्यांचे वितरण सुलभ व्हावे यासाठी तीन झोनल आयुक्तांची निवड केली आहे. त्यानुसार गोवावेस झोनल कार्यालयाची जबाबदारी प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, कोनवाळ गल्ली झोनल कार्यालयाची जबाबदारी महसूल अधिकारी अनिल बोरगावी, अशोकनगर झोनल कार्यालयाची जबाबदारी महसूल अधिकारी संतोष आनिशेट्टर यांच्यावर सोपविली आहे. कोनवाळ गल्ली कार्यालयाच्या हद्दीत केवळ ए खातेधारक असून गोवावेस आणि अशोकनगर कार्यालयांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बी खातेधारक आहेत. विशेषकरून या दोन्ही कार्यालयांमध्ये एजंटांचा वावर वाढल्याच्या तक्रारी असल्याने मनपा आयुक्तांनी गोवावेस आणि अशोकनगर येथील कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article