महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सफाई कर्मचारी संघटनांसमोर आयुक्तांचे नमते

11:19 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या आठवड्यात सोडविण्याचे बैठकीत आश्वासन

Advertisement

बेळगाव : सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. त्यामुळे विविध सफाई कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्तांनी बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी सफाई कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टर्स, जीम, लायब्ररी, बढती, कामगारांची नियुक्ती या विषयांवर जोरदार चर्चा झाली. सफाई कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करून त्या येत्या आठवड्याभरात सोडविण्याचे आश्वासन मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिले आहे.आनंदवाडी येथील क्वॉर्टर्समध्ये असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नेहरुनगर, रुक्मिणीनगर, आझमनगर या परिसरात बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये क्वॉर्टर्स दिले जाणार आहेत.

Advertisement

आनंदनगर शहापूर येथे जीम व लायब्ररीसाठी 38 लाख रुपये क्रिया योजनेंतर्गत मंजूर झाले आहेत. कौन्सिल बैठकीमध्ये त्याबाबत चर्चा करून मंजुरी दिली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 100 सफाई कर्मचाऱ्यांचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत दीपक वाघेला, विजय नरगट्टी यांनी जोरदार आवाज उठविला. त्यावर 15 दिवसांत संपूर्ण कागदपत्रांची छाननी करून त्यांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. 155 कर्मचाऱ्यांना जानेवारी 2014 पासून नोकरीत सामावून घेतले आहे. मात्र वेतन मिळाले नाही. सिंधुत्व प्रमाणपत्र सर्वांनी दिले आहे. त्याची छाननी पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात सात महिन्यांचे एकाचवेळी वेतन देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना सकाळच्यावेळी नाश्ता दिला जातो. त्यासाठी 1 कोटी 78 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती समस्याही दूर होणार असल्याचे सांगण्यात आले. महेश माळगी गेल्या 33 वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये काम करत आहेत. मात्र त्यांना नियमानुसार बढती मिळूनही दिली गेली नाही. तेव्हा तातडीने बढती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत फाईल पाठविण्यात आली असून लवकरच बढती दिली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ बैठक पार पडली. आयुक्तांच्या कक्षातच ही बैठक झाली. या बैठकीला विविध सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 100 कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सामावून घेण्याचा प्रश्न गंभीर होता. त्यामुळे ते कर्मचारी मनपा कार्यालयाच्या आवारात सकाळपासूनच ठाण मांडून होते.

सफाई कर्मचारी कावल समितीचे आंदोलन

महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी संघटनेची बैठक असल्याची नोटीस पाठविण्यात आली. मात्र अलीकडेच काही संघटना स्थापन करून त्यामधून गैरप्रकार केले जात आहेत. त्यामुळे आम्ही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असा अट्टाहास सफाई कर्मचारी कावल समितीने घेतला. त्यामुळे सकाळीच गोंधळ उडाला. तातडीने मनपा उपायुक्त उदयकुमार तळवार हे त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी तातडीने त्या सर्व पदाधिकाऱ्यांची समजूत काढून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली. सफाई कर्मचारी कावल समितीचे अध्यक्ष दीपक वाघेला, कार्याध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, सेव्रेटरी विजय निरगट्टी, खजिनदार षण्मुख आदियांद्र कार्यदर्शी शेखर छब्री, राजमोहन साके यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article