For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकीय पक्षांच्या खर्चावर आयोगाची नजर

06:59 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजकीय पक्षांच्या खर्चावर आयोगाची नजर
Advertisement

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती : खर्च पर्यवेक्षकांची बैठक

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गसूचीनुसारच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर नजर ठेवली जात आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील खर्च पर्यवेक्षक साहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

Advertisement

निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन निवडणुकीदरम्यान केल्या जाणाऱ्या खर्चाची मार्गसूची देण्यात आली होती. एसआर दर निश्चित करून मुख्य विषयांची माहिती देण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बँकांमध्ये होणाऱ्या व्यवहारांवरही नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. संशयास्पद व्यवहारांची तत्काळ माहिती देण्यात यावी, यासाठी सूचित करण्यात आले आहे. तर डिजिटल व्यवहारांवरही नजर ठेवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एफएसटी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून बेकायदेशीर व रोख रक्कम वाहतूक करणे, बेकायदेशीर मद्य वाहतूक करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात येत आहेत. इन्कमटॅक्स, वाणिज्यकर, अबकारी तसेच पोलीस खात्याच्या व इतर अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांतून निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खर्च पर्यवेक्षक हरक्रिपाल खटाना यांनी नियुक्त करण्यात आलेल्या विविध चेकपोस्टना भेट देऊन पाहणी केली. वाहनांची कोंडी होणाऱ्या ठिकाणी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना त्यांनी केली. पेडन्यूजसह इतर खर्चांवर नजर ठेवण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, नोडल अधिकारी शंकरानंद बनशंकरी, साहाय्यक निवडणूक अधिकारी पी. एन. लोकेश, सतीशकुमार, प्रभावती फक्कीरपूर, डॉ. राजीव कुलेर, राजेश्री जैनापूर, एमसीएमसी नोडल अधिकारी गुरुनाथ कडबूर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.