For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगावात 83, बसुर्ते 75, सुळगा(हिं.) 82, बेकिनकेरे 74, तुरमुरीत 83 टक्के मतदान

10:19 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगावात 83  बसुर्ते 75  सुळगा हिं   82  बेकिनकेरे 74   तुरमुरीत 83 टक्के मतदान
Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

उचगाव परिसरात त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि सकाळपासूनच मतदान बूथ परिसरात उपस्थिती तर मतदारांमध्ये मात्र निऊत्साह दिसून येत होता. अनेक केंद्रांवर सकाळी तुरळक गर्दी तर दुपारी उन्हाचे चटके सहन करू लागू नयेत यासाठी मतदार बाहेरच न पडल्याने सामसूम आणि सायंकाळी पुन्हा ऊन ओसरल्यानंतर गर्दी अशा पार्श्वभूमीवर एकंदरीत लोकसभेचे मतदान शांततेत पार पडले. सरासरी या भागात कमीत कमी 74 टक्के ते सर्वाधिक 83 टक्के मतदान झाले. उचगाव परिसरातील उचगाव, सुळगा, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, कोणेवाडी या गावांमध्ये सकाळी त्या त्या गावातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मतदान पेटीची पूजा करून मतदानाला शुभारंभ करण्यात आला. यानंतर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर मतदारांना चिठ्ठ्या देण्यासाठी टेबल घालून बसलेल्या कार्यकर्त्यांना उन्हाच्या चटक्यापासून बराच त्रास त्यांना सहन करावा लागत होता. मतदान केंद्राच्या आवारात मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना उन्हापासून  संरक्षण मिळावे म्हणून शासनाने मंडपाची व्यवस्था केली होती. मात्र सदर मंडप अवघी एक लाईन व पंधरा मतदार उभे राहू शकतील व बाकी पुन्हा उन्हातच उभे राहण्याची वेळ मतदारांवरती आली होती. इतका कमी लांबी-ऊंदीचा हा मंडप घातला होता. परिणामी उन्हात उभे राहण्यापेक्षा गर्दी कमी झाल्यानंतर येऊ म्हणून देखील काही मतदारांनी तेथून काढता पाय घेतल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

उचगाव भागातील मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे

Advertisement

उचगाव एकूण असलेले मतदार 5664, झालेले मतदान 4222, 74 टक्के एकूण मतदान झाले. बसुर्तेत 1198 मतदार असून 927 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 75 टक्के मतदान झाले. कोनेवाडीत एकूण मतदान 689, मतदान 557 झाले. 82 टक्के मतदान झाले. सुळगा(हिं.) गावात 3666 मतदार असून 3018 एकूण मतदारांनी हक्क बजावला. 82 टक्के मतदान झाले. बेकिनकेरे गावांमध्ये 2747 मतदार असून 2046 मतदारांनी हक्क बजावला. 74 टक्के मतदान झाले. कल्लेहोळ गावांमध्ये 2327 मतदार असून 1870 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये 80 टक्के मतदान झाले. तुरमुरीमध्ये 2533 मतदार असून 2229 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 83 टक्के मतदान झाले. अतिवाडमध्ये एकूण 78 टक्के मतदान झाले.

Advertisement
Tags :

.