महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्यावसायिक परवाना, फिरत्या विक्रेत्यांकडून कॅन्टोन्मेंटला लाखोंचा महसूल

10:55 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महसूल वाढीसाठी अनेक उपाययोजना  : मागील वर्षाच्या तुलनेत वाढ

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरामध्ये अनेक आस्थापने आहेत. त्यांच्याकडून कर तसेच व्यावसायिक परवाने घेण्यासाठी कर जमा करून घेतला जातो. चालू आर्थिक वर्षात व्यावसायिक परवान्यांच्या करामधून तब्बल 5 लाख 52 हजार 937 रुपये कॅन्टोन्मेंटकडे जमा झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 108 टक्क्यांनी कर वाढल्याने कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष तसेच लोकप्रतिनिधींनी सीईओ राजीवकुमार यांचे कौतुक केले. शुक्रवारी झालेल्या कॅन्टोन्मेंट बैठकीमध्ये महसुलाबाबत चर्चा करण्यात आली. कॅन्टोन्मेंटने फिरते विक्रेते तसेच बैठे व्यापारी यांच्याकडून कर जमा करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांत 3 लाख 47 हजार 810 रुपयांचा कर कॅन्टोन्मेंटकडे जमा करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये काही ठिकाणी कूपनलिका असून त्यांच्याकडून खासगी टँकरचालकांना पाण्याची विक्री केली जाते. त्यावर लावलेल्या करातून 60 हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे. विहिरींतून पाणी विक्री करणाऱ्यांना लावण्यात आलेल्या करातून 40 हजार रुपये जमा झाले आहेत.

Advertisement

खा. कडाडींची पार्किंगबाबत नाराजी 

कॅन्टोन्मेंट बोर्डने वर्दळीच्या जागांवर पे अॅण्ड पार्किंगची व्यवस्था केली आहे. रेल्वेस्टेशनसमोर पे अॅण्ड पार्किंग असतानाही कोणतीही पावती न देता कर जमा केला जात असल्याने खासदार इराण्णा कडाडी यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात संबंधित पार्किंग चालकाला नोटीस पाठवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच यापुढे स्वाईप मशिनद्वारेच पार्किंगची पावती ग्राहकांना दिली जाणार असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले.

रेल्वे महाव्यवस्थापकांसोबत लवकरच चर्चा 

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीमध्ये बेळगाव रेल्वेस्थानक परिसर येतो. त्यामुळे थकीत कर तसेच इतर परवानग्या यामुळे दोन्ही विभागांमध्ये समन्वय राखणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच हुबळी येथे नैर्त्रुत्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविली जाणार असून यावेळी कॅन्टोन्मेंटचे सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article