कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

24 रुपयांनी स्वस्त झाला कमर्शियल सिलिंडर

06:29 AM Jun 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

तेल विपणन कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत कमी केली आहे. 19 किलोग्रॅम वजनाचा कमर्शियल सिलिंडर आता 24 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ही दरकपात 1 जूनपासून लागू झाली आहे. या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोग्रॅम वजनाचा कमर्शियल गॅस सिलिंडर आता 1723.50 रुपयांना मिळणार आहे. सलग तिसऱ्या महिन्यात कमर्शियल सिलिंडरचे दर कमी झाले आहेत.

Advertisement

कमर्शियल सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक ठिकाणी होत असतो. एक मे रोजी देखील कंपन्यांनी कमर्शियल सिलिंडरचे दर 14.50 रुपयांनी कमी केले होते. तर त्यापूर्वी 1 एप्रिलपासून कमर्शियल सिलिंडरचे दर 41 रुपयांनी कमी करण्यात आले होते.

परंतु घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 853 रुपये आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आंतरराष्ट्रीय इंधनाचे दर अणि विदेशी चलन विनिमय दराच्या आधारावर एटीएफ आणि एलपीजी गॅसच्या किमती बदलत असतात.

एव्हिएशन टर्बाइन फ्यूलच्या (एटीएफ) किमतीत 1 जूनपासून 2.82 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात एटीएफच्या किमतीत घट झाली आहे. मे महिन्यात 4.4 टक्के तर एप्रिलमध्ये 6.15 टक्क्यांची दर कपात करण्यात आली होती. एटीएफचा दर कमी झाल्याने एअरलाइन्सच्या संचालनाचा खर्च कमी होणार आहे. तसेच याचा लाभ विमानप्रवाशांना मिळण्याचीही शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article