For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकणातून धनुष्यबाण गायब करण्याचे महापाप शिंदेंच्या शिवसेनेने केले !

03:00 PM Apr 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कोकणातून धनुष्यबाण गायब करण्याचे महापाप शिंदेंच्या शिवसेनेने केले
Advertisement

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे टीकास्त्र

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

कोकण हे   शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यानी रक्त  सांडून  आणि  घाम गाळून  कोकणात  शिवसेना वाढविली. मात्र , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी मूळ शिवसेनेचा विश्वासघात करत भाजपशी जवळीक साधून सत्ता मिळवली. मात्र आता त्यांची ही महत्त्वाकांक्षा कोकणातून धनुष्यबाण गायब करणारी ठरली आहे, हे महापाप शिंदेंच्या शिवसेनेने केले आहे. याचा आता येथील जागृत मतदार नक्कीच आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मताने जाब विचारतील, असा जोरदार घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रवक्ते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान केला.

Advertisement

या डॉ. परुळेकर पुढे म्हणाले की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री हे सध्या ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री व विद्यमान लोकसभा उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करीत आहेत. केसरकर  एका पत्रकार परिषदेत  त बोलत असताना त्यांच्यासोबत असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांचे चेहरे मात्र बरेच काही सांगून जातात. आताची प्रचार यंत्रणा मंत्री केसरकर यांनी ज्या पद्धतीने पैशांची उधळपट्टी करत वापरली आहे, त्यावरून त्यांनी आपली प्रॉपर्टी विकून राजकारण केले हे त्यांचे मागील विधान संशयास्पद वाटते.  तसेच ज्या पद्धतीने ते सावंतवाडी मतदारसंघात मतदारांना भाजपा उमेदवार नारायण राणे यांना मत देण्यासाठी आवाहन करीत आहेत. अशा वेळी दीपक केसरकर यांनी 2009 पासून नारायण राणे  यांच्यावर केलेला दहशतवादाचा आरोप आता नक्कीच संपलेला आहे काय.?,  हे सुद्धा या मतदारसंघातील सुज्ञ मतदार जाणून आहेत.  थोर संसदपटू स्व. बॅरिस्टर नाथ पै व प्रा. मधु दंडवते यांसारखे वैचारिक रत्न संसदेत पाठवणारा हा तळकोकणाचा मतदार संघ आहे.  त्यामुळे येथील मतदारांना मंत्री केसरकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या बगलबच्चांनी उल्लू बनवू नये. अन्यथा येथील मतदार काय करू शकतो.?,  हे अवघ्या भारताने अनुभवले आहे.  असे सांगत उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. परुळेकर यांनी नामदार राणे यांनी आपल्या प्रचारादरम्यान केलेल्या विविध वक्तव्यांचा खरपूस समाचारही घेतला.  यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेवर कडाडून टीका केली तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना सजग राहण्याचे आवाहन करत आपल्या भावनांशी खेळ करणाऱ्या लोकांना आगामी काळात त्यांची योग्य जागा दाखवून द्यावी, असे भावनिक आवाहन देखील केले.

Advertisement
Tags :

.