For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले कॅम्प येथे १ लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ

12:39 PM Dec 29, 2023 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ले कॅम्प येथे १ लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ
Advertisement

नगरोत्थान योजनेतून कामास २५ लाख रूपयांचा निधी

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजना सन २०२२-२३ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प मध्ये एल.आय.जी. आणि ई.डब्लू.झेड कॅम्प म्हाडा वसाहत मध्ये सोसायटीमधील नागरीकांसाठी १ लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे व इतर अनुषंगीक कामे करणेसाठी मंजुर झालेल्या २५ लाख रूपये किमीच्या कामाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हसते श्रीफळ वाढवून झाले.कॅम्प म्हाडा वसाहतीत दरवर्षी निर्माण होणाऱ्या पिण्याचे पाण्याच्या समस्येबाबत तेथील नागरीकांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केलेल्या प्रयत्नातून शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर व सिंधदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजना सन २०२२-२३ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरीषद हद्दीतील कॅम्प म्हाडा वसाहत मध्ये एल. आय.जी. आणि ई.डब्लू झेड सोसायटीमधील नागरीकांसाठी १ लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे व इतर अनुषंगीक कामे करणेसाठी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम, डॉ. आर. एम. परब, राजू परब, हनिफ म्हाळुंगकर, सनी मोरे, बाबली वायंगणकर, शंकर कोणेकर, समीर गावडे, मनोहर सावंत, प्रणव गावडे, सागर निर्गुण, गणेश जगताप, गिरीष जगताप यांसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.