महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राममंदिरात प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानांचा शुभारंभ

06:58 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राम मंदीर निर्माणकार्य न्यासाचे प्रमुख चंपत राय यांनी केली अनुष्ठान कार्यक्रमाची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था / अयोध्या

Advertisement

अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिरात 22 जानेवारीला भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. मंगळवार पासून या मंदिरात प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानांचा शुभारंभ करण्यात आला असून ही अनुष्ठाने 21 जानेवारीपर्यंत चालणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

प्राणप्रतिष्ठेच्या प्रत्यक्ष सोहळ्याचा प्रारंभ हा 22 जानेवारीला दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी होणार असून तो साधारणत: 35 ते 40 मिनिटे चालणार आहे. एवढ्या अल्प वेळेत हा समारंभ होणार असल्याने त्याच्या आधी नियमानुसार करावी लागणारी अनुष्ठाने आधीच करुन घेतली जाणार आहेत. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अधिक समय लागणार नाही, अशी व्यवस्था केलेली आहे.

11 पुरोहितांकडून अनुष्ठाने

प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक देवीदेवतांना आवाहन केले जाते. हे आवाहन अनुष्ठानांच्या माध्यमातून केले जाते. ही अनुष्ठाने 11 पुरोहितांकडून केली जात आहेत. अनुष्ठानांच्या माध्यमातून देवीदेवतांना प्रसन्न करुन घेतले जाते. त्यानंतर त्यांच्या अनुमतीने प्राणप्रतिष्ठा केली जाते, अशी प्रक्रिया शास्त्रानुसार आहे.

सात अधिवास

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे प्राणप्रतिष्ठा प्रक्रियेत सात अधिवासांचा समावेश असतो. तथापि, सध्या त्यांच्यापैकी केवळ तीन प्रचलीत आहेत. ही प्रक्रिया पार पाडण्याचे उत्तरदायित्व 121 पुरोहितांकडे देण्यात आले असून या पुरोहितांचे नेतृत्व गणेश्वरशास्त्री द्रवीड यांनी स्वीकारले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात सर्व अनुष्ठाने आणि धार्मिक कार्ये होत आहेत. प्राणप्रतिष्ठेसह या अनुष्ठानांचे प्रमुख आचार्य काशीचे विद्वान आणि धर्मपंडित लक्ष्मीकांत दीक्षित हे आहेत. आतापर्यंतचे सर्व कार्यक्रम अनुक्रमानुसार पार पडले आहेत. यापुढचेही कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्राय:श्चित्त आणि कर्मकृतीपूजन 

प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानांचा प्रारंभ ‘प्राय:श्चित्त’ आणि ‘कर्मकृती पूजन’ या दोन समारंभांपासून झाला आहे. आता यापुढच्या प्रत्येक दिवशी धर्मशास्त्राप्रमाणे विविध प्रकारांची अनुष्ठाने होत राहतील. 17 जानेवारीला, अर्थात आज बुधवारी भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या ‘मंदिर परिसर प्रवेशा’चा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ‘तीर्थ पूजन’ होणार आहे. त्यापाठोपाठ ‘जलयात्रा’ आणि ‘गंधाधिवास’ हे कार्यक्रम होतील. हे दोन कार्यक्रम 18 जानेवारीला होतील. त्यानंतर 19 जानेवारीला ‘आयुष्याधाधिवास’, ‘केसराधिवास’, ‘घृताधिवास’ आणि ‘धान्याधिवास’ हे कार्यक्रम  होतील. नंतर 20 जानेवारीला ‘शर्कराधिवास’, ‘फलाधिवास’ आणि ‘पुष्पाधिवास’ हे कार्यक्रम केले जातील. 21 जानेवारीला ‘मध्याधिवास’ आणि ‘शैलाधिवास’ झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानांची सांगता होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

अनुष्ठानांचा कालानुक्रम

ड 16 जानेवारी : ‘प्राय:श्चित्त’ आणि ‘कर्मकृती पूजन’

ड 17 जानेवारी : ‘मूर्ती मंदीर परिसर प्रवेश’, ‘तीर्थ पूजन’

ड 18 जानेवारी : ‘जलयात्रा’ आणि ‘गंधाधिवास’ कार्यक्रम,

मंदिराच्या गर्भगृहात मूर्ती स्थापना

ड 19 जानेवारी : ‘आयुष्याधाधिवास’, ‘केसराधिवास’,

‘घृताधिवास’ आणि

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article