तेलंगणात नौदल रडार स्थानकाच्या कार्यास प्रारंभ
स्थानकाच्या कार्यास प्रारंभ, राजनाथ सिंह यांनी ठेवली आधारशिला : भारतासाठी गर्वाचा क्षण
वृत्तसंस्था/ हैदराबाद
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी तेलंगणाच्या दामागुंडम वन क्षेत्रात नौदलासाठी व्हीएलएफयुत रडार स्थानकाच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. भारत सर्वांना जोडण्यावर विश्वास ठेवतो, तोडण्यावर नाही. याचमुळे आम्ही आमच्या मित्र असलेल्या शेजारी देशांना सोबत घेऊन वाटचाल करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहोत, असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
सागरी सुरक्षा एक सामूहिक प्रयत्न आहे. बाहेरील शक्तींना आमंत्रित केल्याने एकतेच्या प्रयत्नांना नुकसान होईल असे म्हणत संरक्षणमंत्र्यांनी भारतासोबत सागरी सीमा असलेल्या शेजारी देशांना संदेश दिला आहे.
नौदलाच्या व्हीएलएफचे संचालन सुरू झाल्यावर सागरी दलांसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तेलंगणाच्या विकाराबादमध्ये निर्माण होणारे हे रडार स्थानक देशात नौदलाचे दुसरे व्हीएलएफ संचार ट्रान्समिशन स्टेशन असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूच्या तिरुनेलवेलीमध्ये आयएनएस कट्टाबोम्मन रडार स्थानक हे अशाप्रकारचे पहिले स्टेशन आहे. तेलंगणातील रडार स्थानकाच्या निर्मितीकार्य शुभारंभप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रे•ाr आणि केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार देखील उपस्थित राहिले.
हा रडार स्थानक म्हणजे तेलंगणासाठी गर्वाचा क्षण आहे. कारण हा देशातील अशाप्रकारचा दुसरा प्रकल्प असून तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे केंद्रीय मंत्री जी. किशन रे•ाr यांनी म्हटले आहे.