For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार्लस्टन स्पर्धेत कॉलिन्स विजेती

06:44 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार्लस्टन स्पर्धेत कॉलिन्स विजेती
Advertisement

वृत्तसंस्था/ चार्लस्टन (द. कॅरोलिना)

Advertisement

डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या चार्लस्टन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत डॅनियली कॉलिन्सने एकेरीचे जेतेपद पटकाविताना डेरिया कॅसेटकिनाचा पराभव केला.

या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कॉलिन्सने कॅसेटकिनाचा 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. कॉलिन्सने अलिकडे मियामी टेनिस स्पर्धा जिंकली होती. चार्लस्टन टेनिस स्पर्धेत यापूर्वी अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने जेतेपद मिळविले होते. त्यानंतर कॉलिन्स ही स्पर्धा जिंकणारी दुसरी अमेरिकन महिला टेनिसपटू आहे. तिने आतापर्यंत सलग 11 एकेरी सामने जिंकले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.