For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाविद्यार्थ्याचा पंचगंगेत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न : महापालिका कर्मचाऱ्यांमुळे वाचले प्राण

12:54 PM Jan 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
महाविद्यार्थ्याचा पंचगंगेत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न   महापालिका कर्मचाऱ्यांमुळे वाचले प्राण
Advertisement

इचलकरंजी / प्रतिनिधी

शहरालगत पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरुन जयसिंगपूर परिसरातील एका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना नदीतील केंदाळ काढत असलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आली. त्यांनी नदीत उड्या टाकून पाण्यात बुडत असलेल्या त्या संबंधीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे प्राण वाचविले. हा विद्यार्थी धरणगुत्ती ( ता. शिरोळ) परिसरात राहणारा असून, ही घटना मंगळवारी सकाळची होय.

Advertisement

शहरानजीकच्या पंचगंगा नदी घाटजवळ केंदाळ वाढले आहे. नदीतून केंदाळ काढण्याचे काम काही दिवसापासून सुरु आहे. मंगळवारी सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी अनिल सहदेव कांबळे, सूरज राजू शिंदे, सतीश कंवाडे, विजय कांबळे, गणेश हेगडे, अमोल खरुशे, आकाश सनदी आदी जण केंदाळ काढत होते. याच दरम्यान एका विद्यार्थ्याने पंचगंगेवरील जोड पुलापैकी मोठ्या पुलावरून नदीत उडी टाकली. ही बाब वाहनधारकासह काही नागरिकाच्या निदर्शनास आली. त्यांनी आरडाओरडा सुरु केला. त्याचा आवाज नदीतील केंदाळ काढण्यात असलेल्या महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांच्या कानावर आला. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता पंचगंगा नदीत उड्या टाकल्या. पाण्यात बुडत असलेल्या त्या विद्यार्थ्याचे प्राण वाचवित पाण्यातून बाहेर आणले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर या घडल्या घटनेची माहिती समजताच संबंधीत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकानी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी तो जयसिंगपूर परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली. पण त्यांने पंचगंगेत नदीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. यांची माहिती समजू शकली नाही.

Advertisement

Advertisement

.