भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीला नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन
-भारती विद्यापीठाकडून कॉलेजचे अभिनंदन
कोल्हापूर प्रतिनिधी
‘शिक्षण मंत्रालय भारतसरकारच्या ‘नॅशनल असेसमेंट अॅन्ड अॅक्रीडेशन कौन्सील’ (राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषद) च्या क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीला नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळाले आहे. पहिल्या प्रयत्त्नात नॅक ’ए प्लस’ मानांकन प्राप्त झालेले शिवाजी विद्यापीठ संलग्न एकमेव महाविद्यालय आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
नॅककडून अद्यापन अद्ययन प्रकिया, संशोधन व व्यवसायिक कृतीशिलता, नोकरी व व्यवसाय प्रमाण, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, समाजातील वंचित घटकापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे प्रयत्न, महाविद्यालयाचे जनमानसातील प्रतिमा आदींचे मूल्यांकन केले जाते. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगरावजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पुणे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, माजी राज्यमंत्री, डॉ. एच. एम. कदम यांच्या पाठपुराव्यामुळे हे यश संपादन झाले आहे. नॅकच्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ व नॅशनल इन्स्टिट्युशनल रैंकिग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) क्रमवारीत राष्ट्रीय स्तरावर 79 वे स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय क्रमवारी यादीमध्ये सलग आठव्यांदा स्थान व एन बी. ए. अक्रीडेशन तीन वेळा मिळाले आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी च्या 12 व 2 फ या यादीत समाविष्ट झाल्याने आजपर्यंत महाविद्यालयास एक कोटी रूपयाचा संशोधन निधी मिळाला आहे. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे मान्यता‘ प्राप्त पीएच डी संशोधन केंद्र आहे. प्राध्यापकांचे एकुण 800 हुन अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमधुन प्रसिध्द झाले आहेत. 63 हुन अधिक पेंटट मिळाले आहेत. 2005 पासुन 2024 पर्यंत सलग सहा वेळा अग्रणी महविद्यालय म्हणुन दर्जा दिला आहे. महाविद्यालयात उच्च विद्याविभूषीत अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत, सुसज्य ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, खेळांसाठी प्रशस्त किडांगण व सुसज्य सांस्कृतीक सभागृह आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल तर्फे फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी औषधी कंपन्याचे पुल कॅम्पस इंटरव्युह आयोजीत केले जातात. या कॅम्पस इंटरव्युहद्वारे विद्यार्थ्यांचे टाटा कन्स्लटींग सर्व्हिसेस, मॅक्लॉइड फार्मा, अॅवोट एन्कुब ईथीकल्स सन फार्मा अशा कंपन्यामध्ये वेगवेगळ्या पदांवर नेमणुका होतात. प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया मुख्यसमन्वयक नॅक कमिटी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले.
समाधानकारक यश
नॅकचे ‘ए प्लस’ मानांकत मिळाले ही समाधानकारक गोष्ट आहे. विशेषत: संशोधन, प्रकाशन व प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय कार्य असल्यानेच हे यश मिळाले आहे. आता आमची जबाबदारी वाढली असून संशोधन व सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत राहण्यास प्रेरणा मिळाली आहे.
डॉ. एच. एन. मोरे ( प्राचार्य, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी)