कोलगेट-पामोलिव्ह इंडियाचा नफा वाढला
दुसऱ्या तिमाहीमधील आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
घरगुती उपकरणे बनवणारी कंपनी कोलगेट-पामोलिव्ह इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 16.17 टक्के वाढ नोंदवला असून त्यांचा नफा आता 395.05 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्ष 2024-23 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीचा निव्वळ नफा 340.05 कोटी रुपये होता. कोलगेट-पामोलिव्ह इंडिया लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सदरच्या तिमाहीत कंपनीची विक्री 10.04 टक्क्यांनी वाढून 1,609.21 कोटी रुपये झाली आहे, जी एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 1,462.38 कोटी रुपये होती.
जुलै-सप्टेंबरमध्ये सीपीआयएलचा एकूण खर्च वार्षिक तुलनेत 13.6 टक्क्यांनी वाढून 1,695.09 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभा नरसिंहन यांनी सांगितले की, सीपीआयएलने कठीण ऑपरेटिंग वातावरणातही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
ते म्हणाले, ‘विविध विभागांमधील व्यापक वाढ यास कारणीभूत ठरली. आमच्या कोलगेट मॅक्सफ्रेश आणि कोलगेट स्ट्राँग टूथ या मुख्य ब्रँड्सच्या आधारे टूथपेस्टने उच्च सिंगल डिजिट वाढ मिळवली आहे.’ याचा फायदा घेण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे आम्हाला अधिक चांगली उत्पादने आणि जाहिरातींमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवता येईल.’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.