महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा

06:08 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुढील तीन दिवस तापमानात घट अपेक्षित : हवामान खात्याचा अंदाज

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतातील बहुतांश भागात थंडीने कहर सुरू केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांना अधिक सतर्क राहण्यात इशारा जारी केला. तापमानात सातत्याने घट होत असून पुढील तीन दिवस थंडी वाढणार असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.  पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीच्या बहुतांश भागांमध्ये 15 जानेवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्मयता आहे.

पुढील 4-5 दिवसांत उत्तर भारतात दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्मयता आहे,. तर उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात थंड ते गंभीर परिस्थिती अपेक्षित आहे. ‘कोल्ड डे’ची स्थिती वाढत असून पुढील तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात थंडीची लाट ते तीव्र थंडीची लाट येण्याची शक्मयता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात किमान तापमान 3 ते 7 अंश सेल्सिअस आणि राजस्थान व बिहारच्या काही भागांमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article