For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शीतयुद्ध सुरक्षा करार नाटोकडून निलंबित

06:40 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
शीतयुद्ध सुरक्षा करार नाटोकडून निलंबित
Advertisement

काही तासांपूर्वी रशियाने रद्द केला होता करार : युरोपमध्ये शस्त्रास्त्रस्पर्धा सुरू होण्याचा धोका

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रसेल्स

नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोने शीतयुद्धकाळात सोव्हियत संघासोबत (आता रशिया) करण्यात आलेल्या कोल्ड वॉर सिक्युरिटी ट्रीटीला (शीतयुद्ध सुरक्षा करार) निलंबित केला आहे. नाटोने हा निर्णय दोन कारणांमुळे घेतला आहे. पहिले कारण म्हणजे रशियाने या करारातून बाहेर पडण्याची घोषणा मंगळवारी केली. तर दुसरे कारण म्हणजे अमेरिका आणि त्याचे सहकारी नाटो देश रशियाविरोधात युक्रेनला सैन्य मदत करत होते.

Advertisement

शीतयुद्धकालीन या कराराला मुख्यत्वे ‘कन्व्हेंशनल आर्म्ड फोर्स इन युरोप’ म्हटले जाते. यात शस्त्रास्त्र नियंत्रण, पारदर्शकता आणि नियम आधारित आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे सामील आहे.

शीतयुद्ध कालखंडादरम्यान आणि त्यानंतर अनेक प्रकारचे करार झाले होते. तर ज्या सुरक्षा कराराला रशिया आणि नाटोने स्थगित केले आहे, त्यावर 1990 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. नाटोचे सर्व 31 सदस्य देखील या कराराचा हिस्सा होते.

शीतयुद्धादरम्यान ज्या देशांमध्ये वाद होते, त्यांनी परस्परांमध्ये सीमा निश्चित करून सैन्यसंघर्ष टाळावा या हा करारामागील मुख्य उद्देश होता. परंतु हा करार पूर्णपणे अंमलात आणता आला नव्हता. काही मुद्द्यांवर रशिया सहमत नसल्याने हा अडथळा निर्माण झाला होता. तर रशिया-युक्रेन युद्धादरम्यान या कराराचा कुठलाच उद्देश राहिला नव्हता. यामुळे रशियाने मंगळवारी या करारातून बाहेर पडण्याची औपचारिक घोषणा केली आहे.

नाटोची अपेक्षा संपुष्टात

रशिया कुठल्याही क्षणी या करारातून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतो असे नाटो सदस्य जूनपासूनच मानत होते. याचमुळे मंगळवारी दुपारी रशियाने घोषणा करताच काही तासांतच नाटोने देखील करार स्थगित केल्याची घोषणा केली आहे.  खास बाब म्हणजे रशियाने 8 वर्षांपूर्वीच या कराराला कुठलाच अर्थ नसल्याची भूमिका मांडली होती. मे महिन्यात रशियाच्या संसदेत राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी करारातून बाहेर पडण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडला होता. परंतु याची औपचारिक घोषणा आता करण्यात आली आहे. 2007 आणि मग 2015 मध्ये देखील रशियाने या कराराला निलंबित केले होते.

Advertisement
Tags :

.