रस्त्याखाली मिळाली शवपेटी
पुरातत्व तज्ञ झाले चकित
रस्त्याची निर्मिती होत असताना त्याखाली माती, दगड आणि काही अन्य गोष्ठी सापडत असतात. परंतु कधी रस्तेनिर्मितीवेळी शवपेटी मिळताना पाहिले आहे का? काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये घडलेला प्रकार पाहून प्रत्येकजण दंग झाला आहे. तेथे एका रस्त्याचे नुतनीकरण सुरू असताना अचानक रस्त्याखाली शवपेटी मिळाली. तपासणीसाठी पुरातत्व तज्ञांना पाचारण करण्यात आले असता थक्क करणारी माहिती समोर आली आहे.
पुरातत्व तज्ञांनी ही शवपेटी उघडून पाहिली असता त्यात 1500 वर्षे जुने रहस्य दिसून आले. पुरातत्व तज्ञांच्या पथकाला इंग्लंडच्या पीटरबरोनजीक वॅन्सफोर्ड आणि सुटॉनदरम्यान रस्त्याच्या ठिकाणी पाचारण करण्यात आले हेत. या रस्त्याचे काम सुरू असताना तेथे एक शवपेटी मिळाली. ही शवपेटी 750 किलो वजनी आणि 1500 वर्षे जुनी रोमन स्टाइलने तयार केलेली होती.
हा शोध अत्यंत चकित करणारा असून या भागात अशाप्रकारे शवपेटी मिळणे दुर्लभ ओ. या ए47 रोडवर सुमारे 7 महिन्यांदरम्यान 52 पुरातत्वतज्ञ आणि 20 सिव्हिल इंजिनियर्सची टीम काम करत होती. रस्त्याखाली थक्क करणारे आणि इतिहासाशी निगडित गोष्टी हाती लागू शकतात असे त्यांचे मानणे हेते. ही शवपेटी प्राचीन रोमन रोडवर मिळाली असून हा रोड ब्रिटनला जोडणारा होता अशी माहिती हेडलँड आर्कियोलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर डेव्हिड हॅरिसन यांनी दिली. शवपेटीतून मिळालेल्या गोष्टींची तपासणी केल्यावर रोमन पूर्वज कशाप्रकारे राहत होते, त्यांची वैशिष्ट्यो कोणती होती हे कळू शकणार आहे. एका लाइमस्टोनद्वारे हँड कार्व करत ही शवपेटी तयार करण्यात आल्याचे मानले जात आहे. शवपेटीत एका मानवी सांगाडा देखील मिळाला आहे. हा मानवी सांगाडा एका श्रीमंत इसमाचा राहिला असावा असे मानले जात आहे.