For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूर विमानतळावर 30 कोटींचे कोकेन जप्त

06:22 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर विमानतळावर 30 कोटींचे कोकेन जप्त
Advertisement

केनियाच्या नागरिकाला अटक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

तब्बल 30 कोटी रुपयांचे कोकेन बाळगणाऱ्या केनियाच्या नागरिकाला बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. बेंगळूर विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी इंडिगोच्या विमानाने दोहाहून बेंगळूरला आलेल्या एका केनियाच्या नागरिकाची झडती घेतली असता त्याच्याजवळ 30 कोटी रुपयांचे कोकेन आढळून आले आहे, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

शुक्रवारी इंडिगोच्या फ्लाईटने दोहाहून बेंगळूरला आलेल्या केनियन नागरिकाला डीआरआय अधिकाऱ्यांनी व्यापक पाळत ठेवल्यानंतर बेंगळूर विमानतळावर रोखण्यात आले. तपासणीदरम्यान प्रवाशाच्या बॅगेत तीन किलो वजनाचा पांढरा पावडरचा पदार्थ आढळून आला. फील्ड टेस्टिंग किटनुसार सदर पावडर 30 कोटी रुपयांचे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले आहे. एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार सदर नागरिकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.