महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडोनेशियन जहाजातून 220 कोटींचे कोकेन जप्त

06:17 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ओडिशातील बंदरात मोठी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

ओडिशातील पारादीप बंदरावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी 220 कोटी रूपयांचे तब्बल 22 किलो कोकेन जप्त केले आहे. ओडिशा पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयडीएसएफ) आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी इंडोनेशियन मालवाहू जहाजामध्ये ही कारवाई केली आहे. जहाजाच्या व्रेनमध्ये कोकेनची पाकिटे लपवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

भुवनेश्वर कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमव्ही डेबी नावाच्या इंडोनेशियन मालवाहू जहाजावर काम करणाऱ्या व्रेन ऑपरेटरला जहाजावर काही संशयास्पद पॅकेट दिसली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी श्वान पथकासह इंडोनेशियन जहाजावर छापा टाकत कोकेनची पाकिटे जप्त केली. सदर जहाजाने इजिप्तमधून प्रवास सुरू करत इंडोनेशियातील ग्रेसिक बंदरातून ओडिशा गाठले होते. येथून स्टील प्लेट्ससह हे जहाज डेन्मार्कला रवाना होणार असतानाच कोकेनचा मोठा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती भुवनेश्वरमधील कस्टम कमिशनर माधव चंद्र मिश्रा यांनी दिली. तपासणीदरम्यान कोकेनचे पॅकेट स्फोटक वस्तूसारखे दिसत होते, परंतु स्कॅन केल्यानंतर त्या पॅकेटमध्ये अमली पदार्थ लपविल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासणीत जप्त केलेल्या वस्तू कोकेन असल्याची पुष्टी झाली आहे. या प्रकरणात जहाजातील क्रू मेंबर्सना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. याशिवाय अन्य कोणालाही अटक करण्यात आलेली नाही

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article