सीएनजीच्या किमती जैसे थे राहणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आगामी काळामध्ये वाहनांसाठी लागणाऱया सीएनजी इंधनाच्या किंमती या कमी होण्याची शक्यता नसल्याचा खुलासा इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड यांनी केला आहे.
सरकारने गॅसच्या निर्मितीकरता येणाऱया खर्चामध्ये कपात करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिल्या असल्याचे कळते. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) किंमती वाढवताना दीर्घकालीन भविष्याचा विचार नक्कीच करत आली आहे. अंतर्गत गॅसच्या किंमती प्रत्येक महिन्याला वाढवण्याचा निर्णय होत असला तरी सीएनजी किंमतीबाबत मात्र काळजी घेतली जात आहे. याआधी सीएनजी गॅसच्या किंमती यावर्षी मेमध्ये वाढविण्यात आल्या होत्या, असे असले तरी नवी दिल्लीतील सीएनजीच्या किंमती या देशामध्ये सर्वात कमी आहेत.
अदानी टोटलने यासंदर्भात सीएनजीच्या किंमती अलीकडे 4.7 रुपये प्रति किलो प्रमाणे कमी केल्या होत्या. सरकारच्या निर्देशानुसार अदानी टोटलने या संदर्भात निर्णय घेतला होता.
कुठे किमती कमी
येणाऱया काळामध्ये सीएनजीच्या किंमतीमध्ये कपात केली जाणार नसल्याचे सूतोवाच आयजीएलचे संचालक पवनकुमार यांनी केले आहे. सीएनजीचा राष्ट्रीय राजधानी विभागातील सध्याचा विक्री दर हा 75.61 रुपये प्रति किलो इतका आहे. मुंबईत मात्र हाच दर 80 रुपये आणि अहमदाबादमध्ये 83 रुपये आहे.