'सीएनजी' ची वाटचाल शंभरीकडे
कोल्हापूर :
पेट्रोल-ड्रिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. याला पर्याय म्हणून वाहन उद्योगामध्ये काँम्प्रेस नॅचरल गॅस (सीएनजी) चे पंप उभा राहू लागले आहेत. सीएनजीची मागणी वाढत असल्याने, या दोन वर्षांमध्ये सीएनजी गॅसच्या दरात किलोमागे अंदाजे 25 रूपयाची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. आज या गंसचा दर किलोला 95.50 पैसे असा झाला असून, या दराची वाटचाल शंभरीकडे सुरू आहे.
पेट्रोल, डिझेल, एलपीजी, बॉयो सीएनजी, सीएनजी, इल्sाक्ट्रीकवरील वाहने रस्त्यावर धावू लागली आहेत. प्रदूषण, इंधन बचत, चांगले अॅव्हरेज यामुळे सीएनजी वाहनांचे वाढते उत्पादन व मागणी वाढत आहे. पण कांही शहरामध्ये विशेषत: कोल्हापूर शहरामध्ये सीएनजी पंपाची कमतरता दिसून येत आहे. असे असून देखील येत्dया दोन वर्षांत सीएनसीचा दर टप्प्dयाटप्याने वाढत चालला आहे. दोन वर्षांपूर्वी सीएनजीचा दर 70 ते 72 रूपयापर्यंत होता. तो आता 95.50 रूपये इतका झाला आहे.
विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच राज्यात सीएनजी गॅसच्या दरात किलोमागे दोन रूपयाची वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर तेल,क्रूड आदीच्या दरात वाढ ,नैसर्गिक वायूच्या खरेदीत वाढ, तसेच इतर ऑपरेटींग खर्चात वाढ झाल्याने, सीएनजीच्या दरातील वाढ सुरू असल्याचे पंपधारकाकडून सांगण्यात येत आहे. जुलै 2024 मध्ये किलोमागे 1.50 पैशार्चीं वाढ झाली होती.
सीएनजीवरील वाहनांना व गॅसला चालना देण्यासाठी ,29 एप्रिल 2022 मध्ये राज्यसरकारने एक निर्णय घेतला होता. तत्कालीन राज्याचे अर्थंमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पामध्ये ,13.50 टक्के इतका व्हॉट कपातीचा निर्णय घेतला होता. यामुळे सीएनजी गॅस सहा रूपयांनी स्वस्त झाला होता. पण अवघ्या दोन दिवसातच पेट्रोलियम कंपन्यांनी किलोमागे पाच रूपयानी वाढ केल्याने, वाहनधारकामधून नाराजी व्यक्त झाली होती. सद्या पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केल्याने, सीएनजीची वाटचाल शंभरीकडे सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.