For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरात दाखल...मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता

09:24 PM Oct 28, 2023 IST | Abhijeet Khandekar
kolhapur breaking   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरात दाखल   मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता
Advertisement

कोल्हापूर

Advertisement

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळापूर्वीच कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कनेरी मठ येथील गोशाळेच्या आयव्हीएफ केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभर तापला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा आंदोलकांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच राज्यभरात विविध जिल्ह्यातील नेत्यांनाही मराठा आंदोलकांकडून घेराव घातला गेला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गुप्तता कायम ठेवली आहे. कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करणार आहेत. प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांचा दौरा खासगी दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कनेरी मठावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.