For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कापणी, मळणी, पेरणी हंगामात ढगाळ वातावरण : शेतकरी हतबल

11:10 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
कापणी  मळणी  पेरणी हंगामात ढगाळ वातावरण   शेतकरी हतबल
Advertisement

घाईगडबडीत ट्रॅक्टर, बैलजोड्या, माणसे घेऊन भाताच्या मळण्या करण्यात शेतकरी मश्गुल

Advertisement

वार्ताहर/उचगाव 

उचगाव परिसरात सध्या भात कापणी,मळणी आणि पेरणी अशा हंगामात शेतकरी गुंतलेला असतानाच ऐन सुगीच्या हंगामातच बुधवारी ढगाळ वातावरण आणि पावसाची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी शेतातून कापणी केलेल्या भाताच्या मळण्या करण्याच्या घाईगडबडीत गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. ऐन हंगामात पाऊस येण्यासारखी चिन्हे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ बुधवारी दिसून येत होती. अनेक शेतकऱ्यांनी भाताची कापणी करून मळणीसाठी शेतवडीत ठेवली आहेत. मळणीसाठी अजूनही काही दिवस गेले असते. मात्र पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी वर्गाला आता गडबड करण्याशिवाय गत्यंतर नाही. यामुळे बुधवारी सकाळपासून मळणीच्या गडबडीत शेतकरी वर्ग गुंतल्याचे सर्वत्र दिसून येत होते. बुधवारी ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण झाल्याने सकाळपासून मिळेल त्या ट्रॅक्टर, बैलजोड्या आणि माणसे घेऊन भाताच्या मळण्या करण्यात शेतकरी गुंतल्याचे पहावयास मिळत होते.

Advertisement

पावसाची भीती 

वर्षभर काबाडकष्ट करून तयार केलेल्या या भात पिकाला जर पावसाने झोडपले तर संपूर्ण भाताचे नुकसान होईल, ही भीतीही आता शेतकऱ्यांमध्ये आहे. उचगाव परिसरात सध्या भाताची कापणी, मळणी आणि पेरणी यामध्ये शेतकरी गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. भाताची कापणी झाली की मळणी उशिरा केली जाते. भाताच्या वळ्या घालून भाताची बांधणी करून ठेवली जाते. आणि यानंतर लागलीच मसूर, हरभरा, अवरा, वाटाणा, कुळीथ, गहू, मोहरी अशाप्रकारच्या कडधान्यांची पेरणीही केली जाते. जर जमिनीतील ओलावा कमी झाला तरी कडधान्य उगवत नाहीत. यासाठी  कडधान्याची पेरणी ही तितकीच महत्त्वाची असल्याने कापणी झाल्या झाल्या पेरणीच्या हंगामात शेतकरी गुंतलेला असतो. मात्र सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला तातडीने मळणी करणे महत्त्वाचे असल्याने मळणीच्या हंगामात आता शेतकरी गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.