महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी बुद्रुकमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

10:09 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवारात सर्वत्र पाणीचपाणी : शेतकऱ्यांतून समाधान

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

Advertisement

कंग्राळी बुद्रुक परिसरामध्ये सोमवारी दुपारी 1 वाजता ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. गेले आठ ते दहा दिवस कडक ऊन पडले होते. परंतु सोमवारी पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शिवारात पाणीचपाणी केल्यामुळे बळीराजा आनंदीत झाल्याचे दिसून येत आहे. पावसाचे पाणी चव्हाट गल्ली, लक्ष्मी गल्ली व नेताजी गल्लीतून वाहत होते. यावेळी दोन्ही गल्ल्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. सोमवारी सकाळपासूनच हवेमध्ये कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी 1 वाजता आकाशामध्ये एकदम ढग दाटून आले. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाच्या मोठ्या थेंबामुळे कौलारु घरावर प्रमाणापेक्षा अधिक पावसाचे पाणी झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी साचले. गेले आठ दिवस कडक उन्हामुळे शिवारातील पाणी आटले होते. कधी पाऊस पडेल, अशा विवंचनेत शेतकरी असताना सोमवारच्या ढगफुटी सदृश्य पावसाने शिवारात पाणीचपाणी केल्यामुळे रोपलागवड केलेल्या भात पिकाला पाऊस पोषक ठरला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article