महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हलगा-बस्तवाड भागात ढगफुटीसदृश पाऊस

01:00 PM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावसाने सुमारे अडीच तास झोडपले : सर्वत्र पाणीच पाणी : घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान

Advertisement

वार्ताहर /किणये
Advertisement

बस्तवाड-हलगा भागात गुऊवारी दुपारी दोनच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मुख्य रस्त्यावर, गल्ल्यांमधील रस्त्यांवर, तसेच घरांमध्येही पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. सुमारे अडीच तास हा पाऊस झाला. गेले आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गुऊवारी अचानक हलगा, बस्तवाड, सुवर्णविधानसौध परिसर व कोंडुसकोप भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरिकांची दैना उडाली आहे.

सुवर्णविधान सौधजवळील डोंगर भागातून राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले. तसेच हलगा व बस्तवाड या दोन्ही गावांमधील गल्ल्यांमध्ये जणू महापूरच आल्याचे चित्र दिसत होते. गटारीमधून पाण्याचा निचरा होत नव्हता. हलगा व बस्तवाड या दोन्ही गावांतील काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना घरातील पाणी काढण्यासाठी शुक्रवारीही दिवसभर कसरत करावी लागली. घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.

बस्तवाड गावच्या मुख्य रस्त्यावर पाणी 

मुसळधार पावसामुळे बस्तवाड गावच्या मुख्य रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे गावातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच संभाजीनगरातील गल्ल्यांमध्ये पाणीच पाणी दिसून आले. तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरले. हलगा गावातील गल्यांमध्ये प्रचंड पाणी आले होते. रस्त्यांवर काही कारगाड्याही अडकून राहिल्या होत्या. तसेच दुचाकी त्याच ठिकाणी ठेवून वाहनधारकांना आपला बचाव करावा लागला.

सुवर्ण विधानसौधजवळील राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले होते. यामुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती. या पावसामुळे शिवारातील बांध फुटून पिकांचे नुकसान झाले. यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे शिवारातील बांध फुटून बांधाची माती थेट भात व सोयाबीन आदी पिकांमध्ये गेली. त्यामुळे भात व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article