कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, भूस्खलन

06:50 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रामबनमध्ये राष्ट्रीय महामार्ग बंद, चिनाब नदीच्या पातळीत वाढ,  अचानक पूर, भूस्खलनमुळे वाहतुकीवर परिणाम

Advertisement

► वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटी झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग-44 पुन्हा एकदा बंद झाला आहे. शुक्रवारी रामबन येथे ढगफुटीनंतर रस्त्यावर चिखल साचल्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला. महामार्ग खुला असो वा नसो, स्थिती तपासल्यानंतरच बाहेर पडा, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून काही भागात झालेल्या पावसामुळे चिनाब नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे.

जम्मू शहरात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला. पावसानंतर लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला पण नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पावसासोबतच विजांचा कडकडाटही सुरू होता. काही पर्वतीय भागांत जोरदार पाऊस झाल्याने भूस्खलनाच्या घटना निदर्शनास आल्या आहेत.

मुसळधार पावसानंतर जम्मूच्या अनेक भागात नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ दिसून आली आहे. रियासी जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अखनूर सेक्टरमध्येही चिनाब नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. चिनाब नदी हिमाचल प्रदेशातून उगम पावते आणि जम्मू परिसरातून जाते. यानंतर ती पुढे पाकिस्तानला जाते. भारतात तिची लांबी सुमारे 504 किलोमीटर आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू जलवाटप करारांतर्गत या नदीचे पाणी पाकिस्तानला दिले जाते. या नदीची पाणीपातळी वाढल्यास पाकिस्तानला पुराचा धोका संभवतो.

 

मुसळधार पावसाची शक्यता

पुढील तीन दिवस बनिहाल, रामबन, कुलगाम, अनंतनागच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज श्रीनगर हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवला. तसेच बनिहाल-रामबन भागात भूस्खलन आणि दगड कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 2 ते 5 मे दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस, गडगडाट आणि धुळीची वादळे येऊ शकतात. 6 ते 8 मे पर्यंत हवामान सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. यानंतर, 9 ते 11 मे दरम्यान पुन्हा पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article