महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विश्वसंघ जेतेपदाच्या समीप

06:44 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

Advertisement

येथे सुरु असलेल्या लेव्हर चषकासाठीच्या सांघिक टेनिस स्पर्धेत विश्व संघाने जेतेपदाच्या समीप वाटचाल केली आहे. विश्व संघाला आता या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद मिळविण्यासाठी आणखी 2 सामने जिंकावे लागतील.

Advertisement

शनिवारी या स्पर्धेत विश्वसंघाने 4 पैकी 3 सामने जिंकत युरोप संघावर 8-4 अशी आघाडी मिळवली आहे. विश्व संघातील टायफो आणि टेलर फ्रीट्ज यांनी युरोप संघातील अव्वल खेळाडूंचा पराभव केला. विश्व संघातील शेल्टनने युरोप संघातील रुडचा तसेच विश्वसंघातील टेबिलोने युरोप संघातील सित्सिपसचा 6-1, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. युरोप संघाला एकमेव विजय स्पेनच्या अल्कारेझने मिळवून दिला. अल्कारेझने विश्व संघाच्या शेल्टनचा 6-4, 6-4 असा पराभव केला. टायफोने मेदव्हेदेववर 3-6, 6-4 (10-5) असा विजया नोंदविला. आता या स्पर्धेतील उर्वरित शेवटचे 4 सामने बाकी आहेत. या स्पर्धेत 13 गुण मिळविणाऱ्या संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article