महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्मार्ट सिटी कामे मुदतीत पूर्ण करण्याची लगबग

12:57 PM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रसंगी वाहतुकीसाठी रस्ते बंद ठेवण्याचाही विचार

Advertisement

पणजी : राजधानी पणजी शहरात सुरू असलेली विकासकामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी कंपनीने कंबर कसली असून त्यानुसार काही कामे येत्या शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून उर्वरित कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत प्राधान्याने हाती घेण्यात आलेली डॉ. आत्माराम बोरकर आणि डॉ. दादा वैद्य रस्त्यालगतची मलनिस्सारणाची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे स्मार्ट सिटीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर 18 जून मार्ग आणि नंतर महात्मा गांधी या दोन रस्त्यांवरील मलनिस्सारणाची कामे हाती घेण्यात येणार असून त्यावेळी मात्र संबंधित दोन्ही रस्ते सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय  घेण्यात आला आहे.

Advertisement

शिल्लक काम लवकरच पूर्णत्वाकडे

वरील दोन्ही रस्त्यांवर हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये मलनिस्सारण वाहिनी टाकणे, मॅनहोल बांधणे आणि घरे, आस्थापनांना जोडणी देणे आदी कामांचा समावेश आहे. एकूण 19.89 किमी ‘सीवरेज लाईन’पैकी 14.4 किमी लाईन टाकण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून उर्वरित 1.7 किमी काम शिल्लक आहे. ते कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दोन्ही मार्गावरील काम आव्हानात्मक

महात्मा गांधी रोडवर सध्या सीवरेजचे काम प्रलंबित असून ते पुन्हा प्रारंभ झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. 18 जून रोडवरील कामे पूर्ण झाल्यानंतर महात्मा गांधी रोडवरील कामे हाती  घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हे एक आव्हानात्मक काम आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिमेकडील सांडपाणी एमजी रोडच्या खाली असलेल्या मुख्य ट्रंक लाइनमध्ये प्रवेश करते आणि ते मुख्य एसटीपीपर्यंत वाहत जाणार आहे. त्याशिवाय या मार्गावरील मॅनहोल बांधणीचे काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तेही एक आव्हान म्हणूनच स्वीकारले असून निर्धारित वेळेची मर्यादा पाळण्यासाठीच सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे. ही कामे मे पर्यंत पूर्ण न झाल्यास नंतर लगेच सुरू होणाऱ्या पावसाळ्याचा सामना करावा लागणार असून त्यामुळे अधिक विलंब होण्याची शक्यता आहे. म्हण्tgनच कामाचा वेग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती सदर अधिकाऱ्याने दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article