महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भूगर्भातीही हवामान बदल

06:13 AM Jul 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Climate change is also underground
Advertisement

तापमान वाढल्याने जमीन फैलावतेय किंवा आंकुचित होतेय, उंच इमारतींना धोका

Advertisement

पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत असल्याने भूमिगत स्वरुपातही हवामान बदल होत असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. भूगर्भातील या बदलाला सामोरे जाण्यासाठी आमचे सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही. शहरांमध्ये निर्माण होत असलेल्या बहुमजली इमारती भूगर्भीय हवामान बदलाचा विचार करून डिझाइन करण्यात आलेल्या नाहीत. इमारती आणि भूमिगत वाहतुकीमुळे उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचे तापमान दर 10 वर्षांमध्ये 0.1 ते 2.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढत आहे. भूगर्भ तप्त झाल्याने त्याचे डिफॉर्मेशन होते. म्हणजेच जमीन फैलावू लागते किंवा आंकुचित पावू लागते. या कारणामुळे इमारतींचा पाया कमजोर होऊ लागतो आणि इमारतींना तडा जाऊ शकतो. यामुळे या इमारती कोसळण्याचा धोका वाढणार आहे.

Advertisement

तापमानाचे अध्ययन

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीत सिव्हिल अँड एनव्हायॅरमेंटल इंजिनियरिंगचे प्राध्यापक एलेसेंड्रो रोटा लोरिया यांनी सद्यकाळात तापमान वाढल्याने जमिनीचे डिफॉर्मेशन होत असल्याचे सांगितले. आमचे एकही सिव्हिल स्ट्रक्चर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर या बदलासाठी तयार नाही. संशोधक लोरिया आणि त्यांच्या टीमने जमिनीवरील आणि भूगर्भीय तापमानाचे अध्ययन केले आहे. याकरता शिकागो शहराचा त्यांना प्रयोगशाळेप्रमाणे वापर केला. शिकागोच्या अशा भागांमध्ये सेंसर बसविण्यात आले, जेथे बहुमजली इमारती आणि भूमिगत वाहतुकीची सुविधा आहे. अशाच प्रकारे भूमिगत वाहतूक होत नसलेल्या भागातही सेंसर बसविण्यात आले. ज्या भागांमध्ये बहुमजली इमारती आणि भूमिगत वाहतूक सुविधा आहे, ते उष्णतेच्या दृष्टीने कमजोर असल्याचे अध्ययनात आढळून आले.

शिकागोतील बदल

उष्णतेमुळे शहरातील जमीन 12 मिलिमीटरपर्यंत फैलावल्याचे अध्ययनात दिसून आले. तर बहुमजली इमारतींखालील जमीन 8 मिलिमीटरपर्यंत आंकुचित पावली आहे. संशोधकांनुसार हा बदल अत्यंत धोकादायक आहे. गावांच्या तुलनेत शहरं सर्वसाधारणपणे अधिक उष्ण असतात. कारण शहरांमधील इमारतींच्या निर्मितीत वापरण्यात आलेला कच्चा माल सौरऊर्जा अन् उष्णता शोषून घेतात. नंतर या उष्णतेला ते वातावरणात उत्सर्जित करतात. या प्रक्रियेवर अनेक वर्षांपर्यंत अध्ययन करण्यात आले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article