अनगोळ कलमेश्वर देवस्थान परिसरात स्वच्छता मोहीम
बेळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त कलमेश्वर देवस्थान अनगोळ येथे दररोज महाआरती आणि पालखी सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी कलमेश्वर मंदिर परिसरात जेसीबीद्वारे बुधवारी स्वच्छता मोहीम राबविली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. बेळगावात दरवर्षी नवरात्रोत्सव आणि दुर्गामाता दौड मोठ्या प्रमाणात काढली जाते. गल्लोगल्ली स्वागत कमानी, फुलांची आरास, रांगोळ्या त्याचबरोबर मराठमोळ्या वातावरणात दौड काढली जाते. अनगोळ येथील कलमेश्वर देवस्थान परिसरात महाआरती आणि पालखी मिरवणूक निघते. त्यामुळे या काळात भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. तेथील बांधकामाचे जुने साहित्य व इतर केरकचरा स्वच्छ करण्यात आला. याकामी नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.