For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावगाव धरण परिसराची स्वच्छता मोहीम

10:52 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावगाव धरण परिसराची स्वच्छता मोहीम
Advertisement

ग्राम पंचायत-मराठा लाईट इन्फंट्रीचा उपक्रम

Advertisement

वार्ताहर/किणये

तालुक्याच्या पश्चिम भागातील सावगाव धरणात गणेश चतुर्थीला या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धरण परिसरात केरकचरा व निर्माल्य मोठ्या प्रमाणात पडलेले होते. मराठा लाईट इन्फंट्री व बेनकनहळळ ग्रा.पं.तर्फे शनिवार 21 रोजी सकाळी या धरण परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सावगाव धरणात सावगाव, हंगरगा, मंडोळी, बेनकनहळ्ळी, बोकनूर, नानावाडी, गणेशपूर परिसरातील सार्व. मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशचतुर्थी दिवशी धरणाजवळ मोठी गर्दी झाली होती. बेनकनहळ्ळी ग्रा.पं. सदस्य व मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी आजूबाजुला पडलेला सर्व केरकचरा व निर्माल्य ट्रॉलीत जमा केले आणि ही स्वच्छता मोहीम राबविली. इन्फंट्रीचे बटालियन मेजर संतोष व मेजर विक्रम, भरतराव, त्यांचे सहकारी तसेच ग्रा.पं.अध्यक्ष वाय. एम. पाटील, उपाध्यक्षा सायराबानू हुक्केरी, सेक्रेटरी प्रताप मोहिते आदींसह तरुण कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.