महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कामत गल्ली स्मशानभूमीत युवकांकडून स्वच्छता अभियान

10:30 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कामत गल्ली विभागातील युवकांनी एस. पी. ऑफिस रोडवरील कामत गल्ली स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविली. परिसरातील कचऱ्याची उचल करत सव्वाशेहून अधिक नारळ तसेच इतर रोपांची लागवड केली. स्मशानभूमीच्या सुरुवातीला काँक्रिट घालून सोय करण्यात आली. कामत गल्ली स्मशानभूमी येथे अस्वच्छता पसरली होती. यामुळे अंत्यविधी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत कामत गल्ली विभागातील युवकांनी रविवारी स्वच्छता मोहीम राबविली. अंत्यविधीनंतर फेकण्यात आलेला कचरा, साहित्य एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. मारुती निलजकर, भरत देवजी, अविनाश पिसे, अलोक सूर्यवंशी, मल्लिकार्जुन मैलाप्पगोळ यांच्यासह इतर युवक सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article