उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रा.पं.-ता.पं.तर्फे स्वच्छता अभियान
वार्ताहर/उचगाव
उचगाव ग्रा.पं. व ता.पं.च्या वतीने उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सकाळी 10.30 वाजता ता.पं. अधिकारी प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीमध्ये या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संपूर्ण परिसर जवळजवळ दोन तास स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता अभियानामध्ये ता.पं. अधिकारी प्रदीप सावंत, ग्राम विकास अधिकारी शिवाजी मडिवाळ, ग्रा.पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, सदस्या स्मिता खांडेकर, भारती जाधव, रूपा गोंधळी, योगिता देसाई तसेच अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या, ग्रा.पं. सर्व कर्मचारी यांनी या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला होता. यावेळी संपूर्ण परिसर स्वच्छ करून तेथील संपूर्ण कचरा ट्रॅक्टरद्वारे बाहेर काढून पाठवण्यात आला. हे अभियान पूर्ण केल्यामुळे तालुका पंचायत अधिकारी प्रदीप सावंत यांनी सर्वांचे आभार मानले व हा संपूर्ण परिसर स्वच्छ केल्यामुळे समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रा. पं. कर्मचारी प्रभाकर कंग्राळकर, अमोल चोपडे, सोमनाथ नंद्याळकर, चेतन सुतार आदीनी अभियान पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले.