महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फोंडा शहरातील अंतर्गत नाल्यांची सफाई

01:13 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फोंडा : फोंडा शहरातील मुख्य नाल्याला जोडून असलेल्या उपनाल्यांच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले असून नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याहस्ते वरचा बाजार येथील बोरकर पेट्रॉल पंपजवळ या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. अंदाजे रु. 5 लाख खर्चून जलस्त्रोत खात्यातर्फे नालासफाईचे हे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक आनंद नाईक, रुपक देसाई व अन्य नागरिक उपस्थित होते. राणी कन्स्ट्रक्शन ते भारद्वाज अपार्टमेंट खडपाबांध, यशवंतनगर ते सरकारी संकुल तिस्क-फोंडा, आयडी इस्पितळ ते सरकारी संकुल, कुरतरकर नगरी, शिम्रोदेव मंदिर ते टपाल कार्यालय, भूमीपुरुष मंदिर ते बोरकर पेट्रोलपंप, क्रीडाप्रकल्प ते वारखंडे जंक्शन व फोंडा अग्नीशामक केंद्र ते सावईकर इस्पितळ या शहरातील अंतर्गत नाल्यांची साफसफाई होणार आहे. फोंडा शहरात विविध ठिकाणी कचरा व प्लास्टिक वस्तू थेट नाल्यात फेकून दिल्या जात आहेत. हा सर्व कचरा गाळ पावसाळ्यात पाण्याच्या निचऱ्यासाठी अडथळा ठरत असून आसपासच्या शेतीमध्येही विखुरला जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. पालिका क्षेत्रातील नागरिक, छोटे मोठे दुकानदार, आस्थापन चालक व बाजारातील विक्रेत्यांनी आपला कचरा थेट नाल्यात फेकून न देता पालिकेच्या सफाई व कचरा गोळा करणाऱ्या पथकाकडे जमा करावा. फोंडा शहर स्वच्छ व सुंदर राखतानाच सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रत्येकाने या गोष्टींचे काटेकोर पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी यावेळी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article