विसर्जन तलावाची स्वच्छता
10:56 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : शहरातील प्रमुख विसर्जन तलाव हा तलाव आहे की कचरा कुंड या ‘तरुण भारत’ मध्ये दि. 11 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीची महानगरपालिकेने दखल घेतली आहे. मंगळवारी महानगरपालिकेतर्फे या तलावाची स्वच्छता करण्यात आली. या तलावामध्ये गणेशमूर्ती व दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन होते. अलीकडेच या मूर्तींची केविलवाणी अवस्था पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर तलाव स्वच्छ करण्यात आला. परंतु आता तलावामध्ये कचरा टाकण्यात येत आहे. पूर्वी येथे निर्माल्य कुंड ठेवण्यात आले होते. परंतु आता ते कुंड तेथे नाही, त्यामुळे नागरिक तलावामध्येच निर्माल्य टाकत आहेत. या संदर्भात तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मनपाने या तलावाची स्वच्छता केली. मात्र ही स्वच्छता मोहीम सातत्याने केली जावी, अशी मागणी होत आहे.
Advertisement
Advertisement