For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ज्ञानवापी’ तलावाच्या स्वच्छतेस अनुमती

06:50 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ज्ञानवापी’ तलावाच्या स्वच्छतेस अनुमती
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील ‘ज्ञानवापी’ नजीकच्या तलावाची स्वच्छता करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने ही अनुमती दिली. या प्रकरणातल्या हिंदू पक्षकारांनी या तलावाची स्वच्छता करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली होती.

या तलावात मृत मासे आढळून आलेले आहेत. त्यामुळे त्याची स्वच्छता करणे अनिर्वाय झाले आहे. म्हणून स्वच्छता करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली गेली आहे, असे हिंदू पक्षकारांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मुस्लीम पक्षकारांनीही अशाच प्रकारचा अर्ज वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात केला असल्याचे स्पष्ट केले. मुस्लीम पक्षकारांनी हिंदू पक्षकारांच्या याचिकेला विरोध केला नाही. नंतर न्यायालयाने तलावाची स्वच्छता करण्याचा आदेश दिला.

Advertisement

जिल्हा प्रशासनाला आदेश

तलावाची स्वच्छता वाराणसी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीत करावी. स्वच्छता करताना, त्यातील ‘शिवलिंगा’ला कोणत्याही धक्का लागता कामा नये, याची दक्षता घेण्यात यावी. स्वच्छता कार्याचा अहवाल न्यायालयाला देण्यात यावा. कार्यक्रमाच्या वेळी दोन्ही बाजूंचे पक्षकार उपस्थित रहावेत, असा आदेश देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.