आपल्या घरातील वॉशिंग मशीन असे करा साफ
04:07 PM Feb 27, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
Smart tips : आपल्या घरातील वॉशिंग मशीन अनेक वेळा खराब होते. ते स्वच्छ करण्यासाठी काही उपाय आहेत. तुमच्याकडे वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी लिक्विड असेल, तर वॉशर डिटर्जेंट डिस्पेंसरमध्ये घाला. लिक्विड किती प्रमाणात घालायचे ते पॅकेटवर नमूद केलेले असते. कमीत कमी 60 मिनिटे तुमची वॉशिंग मशीन चालू राहील अशा रीतीने मशीन सेट करा. वॉशिंग मशीनच्या टबमध्ये जो कचरा साचला आहे, तो काढून टाकण्यासाठी पाण्याची पातळी निश्चित करा. तुमचे वॉशिंग मशीन रिकामे आहे आणि त्यात कोणतेही अतिरिक्त डिटर्जंट किंवा कोणतीही वस्तू नाही ना याची खात्री करून घ्या. स्टार्ट बटणावर क्लिक करताच मशीन स्वच्छ होण्याची प्रक्रिया चालू होईल.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article