For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक येथे पावसामुळे वर्गखोल्या कोसळल्या

10:57 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक येथे पावसामुळे वर्गखोल्या कोसळल्या
Advertisement

वारंवार सांगूनही शिक्षण खात्याचे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांनी पाहणी करून समस्या दूर करण्याची मागणी 

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

शनिवारी दिवसभर पडलेल्या धुवाधार पावसामुळे कंग्राळी बुद्रुक येथील मराठी प्राथमिक शाळेच्या जीर्ण झालेल्या दोन शाळा खोल्यांची इमारत कोसळली. जीर्ण झालेल्या शाळा खोल्यांची परिस्थिती पाहून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गामध्ये बसविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.सार्वजनिक शिक्षण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोसळलेल्या शाळा खोल्यांची त्वरित पाहणी करून शाळाखोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

कोसळलेल्या शाळा जीर्ण झाल्यामुळे सदर खोल्या बांधून देण्यासाठी यापूर्वी शाळा सुधारणा समिती व पालकवर्गाकडून वारंवार सार्वजनिक शिक्षण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन देऊनसुध्दा शिक्षण खात्याने नेहमी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. जीर्ण वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना न बसवून शिक्षक व शाळा सुधारणा कमिटीने पुढील अनर्थ टाळल्याचेही दिसून आले. परंतु रविवारच्या धुवाधार पावसाने शाळाखोल्या कोसळल्या. परंतु शिक्षक व शाळा सुधारणा कमिटीने दुसऱ्या वर्गामध्ये मुलांची व्यवस्था केली होती. यामुळे शिक्षक व एसडीएमसीच्या कार्यतत्परतेमुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारचा मुसळधार पाऊस व यापूर्वीच्या पावसामुळे श्री कलमेश्वर मंदिराच्या पश्चिम बाजुला असलेल्या शाळाखोल्यांमधील स्लॅबमधून पाणी पाझरुन खोल्यांमध्ये पाणी साचले आहे. दुसऱ्या सुरक्षित वर्गखोल्या नसल्यामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पाण्यामध्ये बसवून शिकावे लागत आहे. ही समस्या मागील अनेक वर्षांपासून आहे. तेंव्हा शैक्षणिक खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.