महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरपंच, सचिवामध्ये खडाजंगी, गटविकास अधिकाऱ्यांचा काढता पाय

12:39 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वेर्ला-काणका पंचायत पुन्हा चर्चेत : सचिव निकीता परब यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले

Advertisement

म्हापसा : गेल्या रविवारी झालेल्या वेर्ला काणका पंचायतीची ग्रामसभेत खंडाजगी झाली होती. पंचायत मंडळाने सचिवांनी दिल्लीवाल्याला परस्पर परवाना दिल्याचा आरोप केला होता. तसेच निर्वाचन अधिकारीही बैठकीस उपस्थित न राहिल्याने ही बैठक रद्द करण्यात आली होती. याचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास यांनी वेर्ला काणका पंचायतीत येऊन पंचायत मंडळ व सचिवांसोबत बैठक घेतली. यात सरपंच व सचिवांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. गटविकास अधिकाऱ्यांसमोरच आरोप - प्रत्यारोप करण्यात आले. दोघे माघार घेत नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी काही निर्णय न देताच काढता पाय घेणे पसंत केले. गुऊवारी दुपारी ग्रामपंचायतीचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी बार्देश गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास पंचायतीमध्ये आले.

Advertisement

यावेळी सरपंच आरती च्यारी, पंच वासुदेव कोरागंवकर, अशोक आर्लेकर, सचिव निकीता परब, पंच दीपाली बिचोलकर उपस्थित होते. त्यानंतर मोहन दाभाळे, निकोल मार्कीस, विश्वास आर्लेकर पंचायतीमध्ये आले होते. गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास यांनी सरपंच सचिव व पंचसदस्यांना कॅबिनमध्ये बोलावून त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सरपंच आरती च्यारी म्हणाल्या, सचिव परब आम्हाला विश्वासात घेत नाही. परस्पर दिल्लीवाल्यांना परवाना देतात. वेळोवेळी रजेवर जातात. दिल्लीतील शेट्टी नामक इसमास कुंपणास परवाना देऊन त्या पुन्हा रजेवर गेल्या. परवाना दिला याची आम्हाला काहीच माहिती नाही. यावेळी सरपंच व सचिव निकीता परब यांच्यामध्ये बरीच शाब्दिक चकमक उडाली. आपण सर्व कायद्यानुसार केले आहे आणि आणखी एक वर्ष याच पंचायतीत ठाण मांडून राहाणार असून शक्य असल्यास बदली करून दाखवा असे म्हणत सचिव निकीता परब तेथून आपल्या खुर्चीकडे उठून गेल्या.

सचिव निकीता परब विऊद्ध दक्षता खात्याकडे तक्रार करणार

पत्रकारांशी बोलताना सरपंच आरती च्यारी म्हणाल्या की, सचिव निकीता परब यांनी पंचायत मंडळाला विश्वासात न घेता परस्पर दिल्लीवाल्यास कुंपण उभारण्यास परवाना दिला आहे. त्याविऊद्ध बीडीओंकडे तक्रार केली. बिडीओ शंकरदास प्रथमेश यांनी येथे येऊन पाहणी केली मात्र काहीच तोडगा काढू शकले नाही. तुम्ही पुढे जा असे बिडीओनी सूचित केल्याने पंचायत मंडळाने सचिव निकीता परब यांच्याविरोधात दक्षता खात्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच आरती च्यारी यांनी सांगितले.

सरपंचाकडून इतिवृत्तांत वहिसील, दक्षता खात्याकडे सुपूर्द करणार

यावेळी पत्रकारांशी बोलताना पंच सदस्य वासुदेव कोरागवकर म्हणाले की, दिल्लीतील नितीन शेट्टी याची फाईल इन्स्पेक्शनसाठी आली कारण तेथे ग्रामस्थांची पारंपरिक वाट आहे. आम्ही पाहणी करण्याचा ठराव घेतला मात्र सचिव निकीता परब यांनी परस्पर त्या कुंपणाला परवाना दिला. सचिवाने ग्रंथालय साफ करून आपल्यासाठी खास केबीन तयार करून घेतले आहे. आपल्यास जेव्हा कुणी भेटायला येतात तेव्हा केबीनमध्ये कुणाला पाठवू नये असा आदेश स्टाफला दिला आहे, अशी माहिती पंच वासुदेव कोरगावकर यांनी दिली.

दुसऱ्या सचिवाची नेमणूक करावी

गटविकास अधिकारी पाहणीसाठी आले असताना सचिव परब इतिवृत्तांत बुकमध्ये मधोमध जागा सोडून पुढे लिहितात व नंतर आपल्यास पाहिजे तसे परस्पर परवाना देतात हा प्रकार निर्दशनास आणून दिला. अशाच प्रकारे कुंपणासाठी परवाना दिला. सर्व नियम धाब्यावर बसवून सचिव बेकायदेशीर कृत्य करीत आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी खुल्या जागेत लाईन मारा असे आम्हाला सांगितले मात्र आम्ही त्यास नकार देत हा इतिवृत्तांत बुक सील करून दक्षता खात्याकडे देणार आहोत, असे वासुदेव कोरगावकर यांनी सांगितले. पंचायत मंत्र्यांनी याकडे लक्ष घालून आम्हाला दुसरा सचिव द्यावा अशी मागणी कोरगावकर यांनी केली. यावेळी पंच अशोक आर्लेकर, मोहन दाभाळे उपस्थित होते.

एक वर्ष अडवून ठेवलेल्या फाईल्स आपण क्लीअर केल्या - सचिव निकीता परब

सचिव निकीता परब म्हणाल्या की, आपण दादागिरी केलेली नाही उलट आपण सर्वांशी थंडपणे बोलते. आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आपल्या जागेत कुंपण कुणीही बांधू शकतो. व्यवसायासाठी परवाना दिला नाही. वर्षभर पंचायत मंडळ फाईल्स अडवून ठेवतात मग महिन्यानंतर पॉवर सचिवांकडे येतो अन्यथा संचालकांनाकडे जातो. आपण सर्व काही कायद्याने केले आहे, असे त्या म्हणाल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article