For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime : सोलापुरात दहा महिन्यांत घडल्या 60 घरफोडीच्या घटना

05:23 PM Dec 05, 2025 IST | NEETA POTDAR
solapur crime   सोलापुरात दहा महिन्यांत घडल्या 60 घरफोडीच्या घटना
Advertisement

                                सोलापुरात चोरी आणि मारहाणाचे वाढते प्रकरणे

Advertisement

सोलापूर : शहरात जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या सातही पोलीस ठाण्यात मागील दहा महिन्यात १७७७ गुन्हे नोंदवले गेले असून, त्यापैकी १५७६ गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. दहा महिन्यात रात्रीच्या वेळी ६० घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४८ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. वाढत्या चोरीच्या घटनामुळे प्रशासनासाठी गंभीर इशारा ठरतो आहे.

शहरात सर्वाधिक चोरी (मोटर वाहन) २५५ प्रकरणे आहेत. तर त्याखालोखाल किरकोळ वादातून दुखापत करण्याच्या २२७ घटना दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांपैकी २२६ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. मारहाण, गंभीर इजा आणि अंतर्गत वादातून घडणाऱ्या घटनांनी पोलीस यंत्रणेची दमछाक सुरूच ठेवली आहे. सोलापूर शहरात गुन्ह्यांची संख्या, प्रकार आणि मालमत्तेची हानी पाहता ही स्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे.

Advertisement

दरोड्याचे दोन गुन्हे
शहरात गेल्या दहा महिन्यात दरोड्याचे दोन गुन्हे घडले असून, त्यात लाखो रुपयांची मालमत्ता पोलीस तपासादम्यान जप्त करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त फसवणूक, विनयभंग, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले या घटनाही तशा गंभीरच आहे. त्यांचे प्रमाण वाढले आहे. अमलीपदार्थ आणि जुगार प्रकरणातही पोलिसांनी कारवाई केली आहे. काही प्रकरणात पोलिसांनी समाधानकारक तपास करत गुन्हे उघडकीस आणले आहे; मात्र गुन्ह्यांचा वाढता आलेख चिंतेचा आहे.

आकडे बोलतात
एकूण कालावधी १० महिने
एकूण पोलीस ठाणे : ०७
एकूण दाखल गुन्हे : १७७७
एकूण उघड गुन्हे १५७६

Advertisement
Tags :

.